Royal Challengers Bengaluru Historical Run Chase: आयपीएल २०२४ चा ४५वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आपली लय कायम ठेवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना जिंकून मोसमातील तिसरा विजय मिळवला. यासह, आरसीबी संघाने या सामन्यात एक कामगिरी केली, जी त्यांनी २०१० च्या सुरूवातीला केली होती.

गुजरातविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ गडी गमावून २०० धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी आरसीबीला २० षटकात २०१ धावा करायच्या होत्या. पण आरसीबीने हे लक्ष्य अवघ्या १६ षटकांत १ गडी गमावून पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे आरसीबीने IPL मध्ये २०० अधिर धावांचे यशस्वीरित्या लक्ष्य गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० मध्ये पंजाब संघाविरुद्ध आरसीबीने ही कामगिरी केली होती.

Nepal fan jumps into swimming pool Video viral in BAN vs NEP match
तौहीद हृदोयच्या विकेटनंतर नेपाळी चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्याचा VIDEO व्हायरल
Arshdeep Singh to pick a wicket on the first ball of a T20 WC 2024 Match against USA
IND vs USA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! आतापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला केला पराक्रम
Disappointment of Pakistani fan who sold tractor video viral
IND vs PAK सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्याने विकला ट्रॅक्टर, भावुक होत सांगितली व्यथा, VIDEO व्हायरल
Rohit Sharma First Batter to Hit Six on Shaheen Shah Afridis first over in T20
IND vs PAK: शाहीन आफ्रिदीविरूद्धच्या एकाच षटकारासह हिटमॅनने रचला इतिहास, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Gurbaz Zadran's century partnership record in T20 World Cup
AFG vs NZ : अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी १० वर्ष जुन्या विक्रमाची केली पुनरावृत्ती, विराट-रोहितशी साधली बरोबरी
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
Brydon Carse banned all format
Brydon Carse : इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजावर बंदी, सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई
Shreyas Iyer Statement on Back Injury Struggle
“माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं…” वर्ल्डकपनंतरच्या पाठीच्या दुखापतीवरून श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा

आरसीबीने केलेला यशस्वी लक्ष्याचा पाठलाग
२०४ धावा – वि पंजाब, बेंगळुरू, २०१०
२१० धावा – गुजरात टायटन्स, अहमदाबाद, २०२४
१९२ धावा – रायझिंग पुणे सुपरजायंट, बेंगळुरू, २०१६
१८७ धावा – सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद,२०२३

हेही वाचा-IPL 2024: विल जॅक्सचे दणदणीत शतक अन् कोहलीची फटकेबाजी, आरसीबीने गुजरातवर मिळवला मोठा विजय

आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चेंडू राखून मिळवला विजय

याशिवाय आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू राखून यशस्वीरित्या लक्ष्य पार केले आहे. २०० अधिक धावांच्या लक्ष्याचा सर्वात जास्त चेंडू राखून विजय मिळवणारा आरसीबी हा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे. आरसीबीने २४ चेंडू शिल्लक ठेवत २०१ धावांचे लक्ष्य गाठले. तर मुंबई इंडियन्सने याआधी २०३ मध्ये २१ चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला होता.

२०० अधिक धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवलेले संघ
२४ चेंडू – आरसीबी वि जीटी, अहमदाबाद २०२४
२१ चेंडू – एमआय वि आरसीबी, वानखेडे २०२३
१५ चेंडू – डीसी विरुद्ध जीएल, दिल्ली २०१७
१२ चेंडू – एमआय वि एसआरएच, वानखेडे २०२३

हेही वाचा- IPL 2024 : ‘सामन्याआधी मला कळलं मी ४ नंबरवर फलंदाजीला उतरणार, पण…’, पहिल्या अर्धशतकानंतर शाहरूख खान काय म्हणाला?

विल जॅक्सचे शानदार शतक

या सामन्यात विल जॅकने शतकी खेळी खेळली. त्याने ४१ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १० षटकार मारले. त्याचवेळी विराट कोहलीनेही संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळली. कोहलीने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. तत्पूर्वी, फाफ डू प्लेसिस २४ धावा करून बाद झाला. जी या डावातील एकमेव विकेट होती.