-
रविवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध कोलकाताचा अंतिम सामना पार पडला. या महाअंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स दशकभरानंतर विजेतेपद जिंकले.केकेआरचे गोलंदाज मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा यांनी पॉवरप्लेमध्ये एसआरएच संघाचे महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला यश मिळवून दिले. (फोटो-पीटीआय)
-
फलंदाज व्यंकटेश अय्यरने अर्धशतक झळकावून हा सामना केकेआरच्या नावावर केला. (फोटो-पीटीआय)
-
या महाअंतिम फेरीसाठी कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक जुही चावला, जय मेहता, मार्गदर्शक गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव जय शाह उपस्थित होते. (फोटो-पीटीआय)
-
तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ठरलेल्या कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान आपल्या कुटुंबासह ट्रॉफी सेलिब्रेशन करताना दिसला. केकेआरने ११४ धावांचे लक्ष्य केवळ १०.३ षटकात पार पडला.
(फोटो-पीटीआय) -
आयपीएल २०२४ मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हैदराबादच्या कर्णधार पॅट कमिन्सला पुरस्कार देण्यात आला. (फोटो-पीटीआय)
-
केकेआरच्या कर्णधार श्रेयस अय्यरला बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते चॅम्पियन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. (फोटो-पीटीआय)
-
केकेआर संघाने दशकभरानंतर विजेतेपद जिंकले आणि आयपीएलच्या विजेते संघांच्या यादीत केकेआर हे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स बनले. (पीटीआय फोटो)
-
केकेआरच्या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेत सामन्यामध्ये आपले योगदान दिले आणि आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. (पीटीआय फोटो)
-
KKR च्या जबरदस्त विजयादरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की शाहरुख खानने पुढील 10 वर्षांसाठी KKR चे व्यवस्थापन करण्यासाठी गौतम गंभीरला ‘ब्लँक चेक’ ऑफर केला आहे. (पीटीआय फोटो)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही