Loksatta
जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊन जवळजवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. करोनाआधी आणि करोनानंतर असं वर्गीकरण करता येईल एवढा परिणाम या साथीने जगावर केलाय. अगदी प्रवास, पर्यटन, शैक्षिण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच मानवी जीवनाशी नगडीत सर्वच क्षेत्रांवर करोनाचा परिणाम केलाय.
करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील अनेक देशांमध्ये झाला असून दिवसोंदिवस तो अधिक धोकायदायक ठरत आहे. अनेक ठिकाणी हा विषाणू स्वत:चं रुप बदलत नव्या स्वरुपात म्हणजेच व्हेरिएंटमध्ये समोर येतोय. त्यामुळेच लसीकरणाचाही त्याच्यावर फारचा परिणाम होताना दिसत नाहीय.
करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. या देशात सध्या ओमायक्रॉनचा वेगाने प्रादुर्भाव होतोय.
अमेरिकेत मागील दोन वर्षांमध्ये आठ लाख जणांना करोनामुळे प्राण गमावावा लागलाय. अजूनही अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे.
मात्र त्याचवेळेस एकीकडे अमेरिका, चीन, भारत यासारख्या जागतिक अर्थसत्तांना मोठा फटका बसलेल्या करोनापासून आजही काही देश अगदी सुरक्षित आहेत.
२०१९ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढून न आलेले तब्बल १० देश असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
या देशांपैकी अनेक देश हे छोट्या छोट्या बेटं आहेत. पॅसिफिक आणि अटलांटिकच्या समुद्रामध्ये असणाऱ्या या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव न होण्याचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे ते म्हणजे हे देश सर्व बाजूने समुद्राने वेढलेले आहेत.
अर्थात नैसर्गिक परिस्थितीबरोबरच काही देशांनी लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे आणि बदललेल्या प्रवास धोरणांमुळे या देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला नाही.
यापैकी दोन देशांमध्ये हुकुमशाही असल्याने त्या देशांमध्ये करोनाची काय परिस्थिती आहे याची ठोस आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही.
अर्थात याच गोष्टीमुळे या दहा देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी काही प्रकरण दाबली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतर संघटनांनी शक्यता व्यक्त केलीय.
असं असलं तरी या देशांचा समावेश सध्या तरी करोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या देशांमध्येच करता येईल. पाहूयात असे देश नक्की कोणते आहेत आणि त्यांनी काय उपाययोजना केल्या.
नऊ छोट्या बेटांचे मिळून बनलेले हे द्वीपराष्ट्र दक्षिण पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाई बेटांच्या साधारण मध्यावर आणि फिजी बेटांच्या उत्तरेला वसलेले असून हा देश राष्ट्रकूल समुहाचा भाग असूनही त्यांनी वेळीच करोना निर्बंध लागू केले. यामध्ये क्वारंटाइन करण्याचाही समावेश होता.
तुवालुमधील दर १०० व्यक्तींपैकी ५० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
तोकलौ >> जागतिक आरोग्य संघटनेनं दक्षिण पॅसिफिक समुद्रामधील तोकलौ या लहान लहान बेटांपासून बनलेल्या देशाचा समावेश करोनामुक्त देशांच्या यादीत केलाय.
एकूण तीन लहान लहान बेटांपासून बनलेल्या या देशाचं एकूण क्षेत्रफळ आहे १० चौरस किलोमीटर. य
तोकलौची लोकसंख्या अवघी दीड हजार इतकी असून या देशात कोणतेही विमानतळ नाहीय.
तौकलौला जाण्यासाठी न्यूझीलंडवरुन बोटीचा पर्याय उपलब्ध आहे. इतर देशांपासून फार दूर असल्याने या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही.
सेंट हिलीना >> दक्षिण अटलांटिक समुद्रामध्ये असणारा हा छोटा बेटवजा देश खरं तर ब्रिटीशांच्या ताब्यात असणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी आहे.
सेंट हिलीना हा देश आणि येथील प्रदेश हा जगातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक मानला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सेंट हिलीना येथील दर १३८ व्यक्तींपैकी १०० जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.
या देशाची लोकसंख्या चार हजारांहून थोडी अधिक आहे. या देशाचं आकारमान छोटं असलं तरी त्यांचं स्वतंत्र्य विमानतळ आहे.
पिटकॅरन बेटे >> पॅसिफिक महासागरामधील चार लहान मोठ्या बेटांपासून हा देश तयार झालाय.
सीआयएच्या वेबसाईटवरील पिटकॅरन बेटांच्या माहितीनुसार या देशामध्ये कायमस्वरुपी वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संख्या अवघी ५० इतकी आहे.
पिटकॅरनमधील जवळजवळ सर्व लोक ही अॅडम्सटाऊन या गावामध्येच राहतात. इतर तीन बेटांवर लोकवस्ती अस्तित्वातच नाहीय. कमी लोकसंख्येमुळे येथे करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाहीय.
न्यूवे >> हा देश जगातील सर्वात मोठ्या कोरल्स म्हणजेच प्रवाळांपासून बनलेल्या बेटांवर वसलेला आहे.
न्यूझीलंडपासून हा बेटवजा देश अडीच हजार किलोमीटर दूर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आहे.
न्यूवे देशाला करोनाविरुद्धच्या लढण्यामध्ये न्यूझीलंडने मदत केली. न्यूझीलंड हा करोनाशी सर्वात यशस्वीपणे दोन हात करणारा देश म्हणून ओळखला जातो.
नाऊरु >> दक्षिण प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेला नौरु किंवा नाऊरु हा सार्वभौम देश जगातला सर्वांत लहान प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो.