-
मुंबईत मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जातो.
-
मुंबईत अनेक चर्च आहेत ज्यांना नाताळानिमित्त सजवले जाते. (फोटो स्त्रोत: माउंट मेरी चर्च/फेसबुक)
-
नाताळ साजरा करण्यासाठी तुम्ही केरळमध्येही जाऊ शकता.
-
केरळमध्ये अनेक ऐतिहासिक चर्च आहेत, जिथे नाताळ उत्साहात साजरा केला जातो.
-
सांताक्रूझ बॅसिलिका, सेंट मेरी कॅथेड्रल, एडथुआ चर्च, सेंट जॉर्ज सायरो-मलबार कॅथोलिक फॉरेन चर्च आणि पल्लीकुन्नू चर्च यांसारखी येथील अनेक मोठी चर्च प्रसिद्ध आहेत. (फोटो स्रोत: stgeorgeforanechurchedappally.org)
-
नाताळाच्या दिवशी बंगरूळूमधील सगळ्या चर्चना आकर्षक रोषनाई केली जाते.
-
बंगरूळूचे फ्रान्सिस झेवियर कॅथेड्रल आणि इन्फंट जीझस चर्च नाताळसाठी प्रसिद्ध आहेत. (फोटो स्रोत: @सेंट फ्रान्सिस झेवियर्स कॅथेड्रल, बंगलोर/फेसबुक)
-
नाताळनिमित्त दिल्लीतील शॉपिंग मॉल्सपासून ते चर्चपर्यंत सर्व ठिकाणे आकर्षक पद्धतीने सजवली जातात.
-
नाताळाच्या दिवसात दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्चमध्ये एक वेगळीच चमक पाहायला मिळते आहे. (फोटो स्रोत: @सेक्रेड हार्ट कॅथेड्रल, दिल्ली/फेसबुक)
-
नाताळ साजरा करण्यासाठी गोवा उत्तम जागा आहे.
-
नाताळाच्या दिवसात गोव्यातील सगळ्या चर्चना भव्य रोषनाई केली जाते. तसेच गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत पार्ट्याही आयोजित केल्या जातात. (फोटो स्त्रोत: ख्रिसमस इन गोवा/फेसबुक)
-
कोलकाताचा ख्रिसमस सेलिब्रेशन संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत.
-
नाताळच्या निमित्ताने शहराला सुंदर पद्धतीने सजवण्यात येते. तसेच ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. (फोटो स्रोत: @kolchristmas/innstagram)
-
पाँडिचेरी किंवा पुडुचेरीमधील नाताळाला फ्रेंच वारसा लाभला आहे.
-
या ठिकाणी फ्रेंच आणि भारतीय सणांचे मिश्रण बघायला मिळते. (फोटो स्रोत: पाँडिचेरी हॅपनिंग्स/फेसबुक)
-
मेघालयातील शिलाँग शहरात ख्रिश्चनांची मोठी लोकसंख्या आहे. येथे नाताळ मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
-
येथील ‘द कॅथेड्रल चर्च’ हे एक मोठे पर्यटन स्थळ मानले जाते. (फोटो स्रोत: @theshillongtimes/instagram)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप