-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून, हे लग्न अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यातील एक प्रमुख कारण म्हणजे या विवाहाचे आयोजन करणारे प्रसिद्ध पंडित.
-
आज म्हणजेच १२ जुलै रोजी अनंत आणि राधिका सात जन्माचे सात फेरे घेतील. ज्योतिषशास्त्रानुसार अनंत-राधिकाचा विवाह हस्त नक्षत्र आणि सप्तमी तिथीच्या शुभ मुहूर्तावर होईल. दरम्यान, जाणून घेऊया अनंत राधिकाचे लग्न कोणते पंडित लावून देणार आहेत?
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत आणि राधिकाचे लग्न पंडित चंद्रशेखर शर्मा लावतील. पंडित चंद्रशेखर शर्मा हे भारतातील प्रसिद्ध पंडितांपैकी एक पंडित आहेत.
-
पंडित चंद्रशेखर शर्मा दिग्गज, मोठ्या व्यक्तींच्या घरी पूजा आणि विवाह आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, पंडित चंद्रशेखर अंबानी कुटुंबाच्या बहुतांश कार्यक्रमांना हजेरी लावतात अशीही माहिती आहे.
-
जामनगरमध्ये राधिका अनंतच्या विवाहपूर्व स्वाक्षरी समारंभ सोहळाही पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या हस्ते पार पडला. अंबानी कुटुंबातील बहुतेक विशेष पूजांचे कार्यक्रम पंडित चंद्रशेखरच करतात.
-
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्नही पंडित चंद्रशेखर यांनीच लावले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचाही विवाह चंद्रशेखर यांनीच लावला होता.
-
पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या फेसबुक अकाऊंटवर दिलेल्या बायोवरून असे दिसून येते की ते केवळ ज्योतिषी आणि पुजारी नाहीत तर पर्सनल कोच आणि लाईफस्टाईल मोटिवेटर देखील आहेत.
-
पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या दक्षिणेबद्दल सांगायचे तर, त्यांच्या अधिकृत वेबसाइट pujahoma.com वर दिलेल्या माहितीनुसार, ते लग्न लावून देण्यासाठी २५ हजार रुपये दक्षिणा घेतात.
-
लग्नाव्यतिरिक्त कुंडली वाचन, कुंडली जुळवणे आणि मुहूर्त निवड यासाठी ते १००० रुपये दक्षिणा घेतात. दुकान/कारखान्याचे उद्घाटन, भूमीपूजन आणि सत्यनारायण पूजेसाठी ५००० रुपये दक्षिणा घेतात.
-
रुद्र अभिषेकसाठी पंडित चंद्रशेखर ११,००० रुपये दक्षिणा घेतात. याशिवाय सुदर्शन होम, मृत्युंजय मंत्र पठण, प्रत्यांगिरा, वास्तुशांती, चंडी होम, रुद्र होम आणि होम-बगलामुखी यासाठी ५०,००० रुपये त्यांची दक्षिणा आहे.
-
त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी सेवा दिलेल्या काही ग्राहकांची नावेही नमूद आहेत. त्यांच्या ग्राहकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टॅली, बीकेटी, प्रियांका चोप्रा जोनस, सोनू निगम, वुडक्राफ्ट आणि हिमतसिंगका यांचा समावेश आहे. (Photos Source: Chandra Shekar Sharma/Facebook)
(हे पण वाचा: ‘अशी’ आहे अनंत आणि राधिकाची प्रेम कहाणी! वाचा बालपणीची मैत्री ते जोडीदार बनण्यापर्यंतची गोष्ट, कोविडच्या काळात दोघेही…)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case