लोकसत्ता वार्ताहर

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून जिल्ह्याचे कारभारी नियुक्त झाले असून कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. अशा स्थितीत आपलाच गट सरस हे दाखवण्यासाठी दोन्ही गटांत शक्ती प्रदर्शनाची चढाओढ लागली आहे. शरद पवार गटाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना बीडमध्ये आणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याला तोड म्हणून अजित पवार गटात सर्वप्रथम प्रवेश करणार्‍या पदाधिकार्‍यांपैकी बळीराम गवते, बाळा बांगर यांनी त्यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना आणून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
Nitin Gadkari, criticism, comment,
प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका, टिप्पणीपासून ‘हा’ नेता अलिप्त
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Solapur, vote, temperature, BJP,
सोलापूर : वाढत्या तापमानात मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान; भाजपच्या प्रतिष्ठेची, तर काँग्रेस व शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई
Emotional Post For Sharad Pawar
शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भावूक पोस्ट “साहेब आम्ही खिंड लढवतो, तुम्ही..”
Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
traffic jam in pune due to candidates filing nomination
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; पुण्यात वाहतूककोंडी
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन

शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघासह आता जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच संदीप क्षीरसागर यांचे बीडमध्ये जंगी स्वागत झाले. युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना घेऊनच जिल्ह्यात आलेल्या क्षीरसागरांनी दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा दावा केला. येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत ताकद दाखवून देऊ असेही त्यांनी बैठकीत सांगितले. जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर पलटवार करण्यासाठी एकेकाळचे त्यांचे समर्थक माजी सभापती बळीराम गवते यांनी अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत त्यांनाच आव्हान दिले आहे. त्यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली. यातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी सूरज चव्हाण यांनी आमदार सत्तेत होते तरीही बीडमध्ये येणार्‍या रस्त्यांची दुरवस्था कशी? याविषयी माहिती घेतली असता येथे रस्त्यात टोल नसून विकास कामातच टोल असल्याचे कळले. त्यामुळे आता हा टोल कायमचा बंद करू असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार संदीप क्षीरसागरांना लक्ष्य केले.

हेही वाचा – ‘कसब्या’चा धडा घेऊन भाजप शहराध्यक्षांची निवड

हेही वाचा – “आया-बहिणींवरचे अत्याचार ‘राजस्थान’ सहन करणार नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस सरकारवर टीका

अजित पवारांनी ठरवले तर एखाद्याला आमदार करतात किंवा घरीदेखील बसवतात, असे म्हणत बीड मतदारसंघात बळीराम गवते यांचे भवितव्य मोठे असल्याचे सूरज चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने पहिल्याच बैठकीला पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षांना आणून जनता आपल्याच सोबत असल्याचा दावा करत केलेले शक्ती प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले आहे.