कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात असल्याने साऱ्यांचे लक्ष वेधलेल्या कल्याण मतदारसंघातील लढत अगदीच एकतर्फी होते की चुरशीची होते याचीच उत्सुकता आहे. भाजपची नाराजी असली तरी मोदी हे खणखणीत नाणे शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.

कल्याण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला अडचणीत आणण्याची खेळी ठाकरे गटाकडून खेळली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण ठाकरे गटाने नवखा चेहरा रिंगणात उतरविल्याने अटतटीची लढत होण्याची शक्यता कमी दिसते.

hasan mushrif Kolhapur loksabha marathi news
कोल्हापुरातील पराभवाबद्दल भाजपकडून पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर ठपका
Hasan Mushrif, Sanjay Mandalik,
संजय मंडलिक यांच्या पराभवाला हसन मुश्रीफ जबाबदार? भाजपच्या निष्कर्षाने कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी
ubt chief uddhav thackeray slams pm narendra modi without taking name over degree certificate
माझे पदवी प्रमाणपत्र खरे! उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला
Supriya Sule, Ajit Pawar,
सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण
Bhavana Gawali
“एकनाथ शिंदेंवर दबाव होता”; भावना गवळींचं मोठं विधान, म्हणाल्या, “जेव्हा अशा स्क्रिप्ट लिहिल्या…”
tai kannamwar, Pratibha Dhanorkar, Pratibha Dhanorkar Becomes Chandrapur s Second Woman MP, chandrapur lok sabha seat, After Six Decades
चंद्रपूर : ताई कन्नमवार यांच्यानंतर सहा दशकानंतर प्रतिभा धानोरकर ठरल्या दुसऱ्या महिला खासदार
Sanjay mandlik lost lok sabha election
संजय मंडलिक यांच्या पराभवाचे चिंतन; महायुतीच्या नेत्यांची बैठक
Make Nitin Gadkari Prime Minister workers deamad in front of gadkari residence
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा

आणखी वाचा-‘मर्द को भी दर्द होता है!’ असे म्हणत एक अख्खा पक्षच उतरलाय निवडणुकीच्या रिंगणात

कल्याणचे दोनदा प्रतिनिधीत्व केलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांत ठाकरे गटापेक्षा मित्र पक्ष म्हणजे भाजपशीच अधिक दोन हात करावे लागले. भाजप आणि शिंदे यांच्यातील संबंध एवढे ताणले गेली की डॉ. शिंदे यांनी पत्रक काढून राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. तसेच आगामी निवडणूक लढविण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा विषय फारच ताणला गेल्याने भाजपच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली. पण स्थानिक पातळीवर शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सूत जुळू शकले नाही. ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे’ या एकाच मुद्द्यावर डोंबिवलीत कितीही नाराजी असली तरी डॉ. शिंदे यांना पाठिंबा मिळू शकतो.

कल्याण मतदारसंघाचे गेली १० वर्षे डॉ. शिंदे प्रतिनिधीत्व करीत असले तरी या मतदारसंघातील प्रश्न कायम आहेत. शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी हे एक दिव्य आहे. याशिवाय रस्त्यांची अवस्था बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून कल्याणमध्ये निधीची खैरात सुरू झाली. विकासाची कामे हाती घेण्यात आली. पण लोकांचे हाल अद्यापही कमी झालेले नाहीत. डॉ. शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रविकास मंडळ, रस्ते विकास महामंडळ, महापालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प या भागात सुरू झाले. विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचे रतीब या मतदारसंघात एकीकडे मांडले जात असताना दुसरीकडे मात्र डॉक्टर शिंदे यांचे विरोधकही वाढत गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या भागातील एकमेव आमदार राजू पाटील, भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद दिसले. कल्याण पूर्व येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत तर त्यांचे वितुष्ट कायम राहिले. कळवा मुंब्रात जितेंद्र आव्हाड हे तर शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी. ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री पुत्राला कल्याण लोकसभेची निवडणूक सोपी जाणार नाही, असा कयास सुरुवातीला बांधला जात होता. सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची नाराजी हे शिंदे यांच्यापुढे मुख्य आव्हान मानले जात होते. पण विरोधात तगडा उमेदवार नसल्याने तेवढेच फायदेशीर ठरले आहे.

आणखी वाचा-राम मंदिरानंतर ‘कृष्ण मंदिरा’साठी भाजपाला हव्या चारशेपार जागा?

‘गद्दारांच्या घराणेशाहीला एक महिला धडा शिकवेल’ हा ठाकरे गटाचा या निवडणुकीत प्रचार सुरु ठेवला आहे. वैशाली. दरेकर यांच्या उमेदवारीने शिंदे समर्थकांना आता निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र असताना गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटांनी संपूर्ण मतदारसंघात अत्यंत नियोजनबद्ध असा प्रचार केल्याचे दिसते. गोळीबार प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक अंतर्मनाने कोठे आहेत तेच कळत नाहीत. आमदारांची पत्नी उघडपणे ठाकरे गटाच्या प्रचारात सहभागी झाली होती. कल्याण लोकसभेत अडीच हजार कोटीची विकास कामे केल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जात असला तरी, या कामांना नाराजांचे मोठे आव्हान आहे.

मतांच्या गणिताचा लाभ

कल्याण लोकसभेतील कळवा-मुंब्रा हा काँग्रेस-राष्ट्रवादी, डोंबिवली भाजप-संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ संमिश्र, कल्याण ग्रामीण आगरी बहुल मतदारसंघ आहेत. कल्याण लोकसभेत २८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. कधी नव्हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या प्रचार सभामध्ये यावेळी दिसले. मुंब्र्यात एकगठ्ठा मतदान व्हावे यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.