यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रचारसभा घेतल्या, हे पाहता भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे का?

खरगे- तसे नसते तर मोदींनी इतक्या सभा घेतल्याच नसत्या. पूर्वी कधी घेतलेल्या पाहिल्या का? महाराष्ट्रच नव्हे तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक अशा सगळ्या राज्यांमध्ये मोदींचा प्रचाराचा धडाका सुरू होता. ‘माझ्यामुळे पक्षाला महत्त्व आहे, मीच पक्षाला जिंकून देऊ शकतो, माझ्यामुळे पक्षाला सत्ता मिळू शकतो’ अशी घमेंड मोदींमध्ये आहे. त्यामुळे मोदींना गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रचारसभा घेत फिरावे लागते. मोदी ‘चारसो पार’चा दावा करत आहेत, ते तेवढ्यावरच थांबले नाही तर भाजप ‘सहाशे पार’ जाईल असाही दावा त्यांनी केला असता. देशाचा पंतप्रधान अतिशयोक्ती करत असेल तर लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास कसा वाटेल? यापूर्वी एकाही तत्कालीन पंतप्रधानाने आकड्यांची अतिशयोक्ती केली नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग अगदी अटलबिहारी वाजपेयींनी देखील कधीही आकड्यांचा खेळ केला नव्हता. ते धोरणांवर बोलत असत. मोदींकडे धोरणच नाही. त्यांच्या सरकारने केलेल्या कामाबद्दल ते बोलत नाहीत. देशहितासाठी काय केले याबाबत मोदींकडे लोकांना सांगण्याजोगे काहीही नाही. दिवस-रात्र काँग्रेसला शिव्याशाप देणे हे एकमेव काम मोदी करत असतात. १४ वर्षे तुरुंगात घालवली, लोकशाही बळकट केली, संविधानाच्या चौकटीत राहून देश चालवला त्या नेहरूंना दूषणे देण्याशिवाय मोदींनी काहीही केलेले नाही.

Mav leaders bjp Campaigning convention ajit pawar mahayuti
मविआ नेते लक्ष्य; भाजप अधिवेशनात प्रचाराची दिशा स्पष्ट, ‘संभ्रमा’तील कार्यकर्त्यांना संदेश
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Former President Donald Trump announced his candidacy at the Republican Party convention for the US presidential election
अधिवेशनात जंगी स्वागत, ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; व्हान्स उपाध्यक्षपदाचे उमेदवार
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
Nagesh Patil Ashtikar
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या खासदाराची तक्रार
bjp s attempt to show stable government despite loses majority in lok sabha election
लालकिल्ला : मूठ आवळली आणि वाळू निसटली!
Sharad Pawar, Sharad Pawar latest news,
कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार

मोदी काँग्रेस विरोधात बोलायचे सोडून अदानी-अंबानीविरोधात बोलू लागले आहेत…

खरगे- अदानी-अंबानींचे नाव घेऊन मोदी स्वतःच्याच जाळ्यात अडकले आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांकडे काळा पैसा असल्याचा पुरावा मोदींनी दिला आहे. ट्रक-टेम्पो भरून काँग्रेसला पैसे दिल्याचे तुम्हाला माहीत होते तर तुम्ही काय झोपा काढत होता? तुम्ही केवळ बोलताय, कारवाई करत नाही. तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात. त्यावरून स्पष्ट होते की, मोदींकडे बोलण्याजोगे काहीही नाही. अदानी-अंबानींविरोधात ‘ईडी’, प्राप्तिकर खात्याची चौकशी सुरू करण्याची मागणी राहुल गांधींनी केल्यावर मात्र मोदी मूग गिळून गप्प बसले!

हेही वाचा…मुस्लिम, हुकूमशहा अन् दिवाळखोरी शब्द वापरण्यावर बंदी; सीताराम येचुरी अन् देवराजन यांच्या भाषणातून शब्द वगळले

बँक खाती गोठवल्यानंतरही काँग्रेस निवडणूक लढवत आहे, हे कसे साध्य झाले?

खरगे- भाजप सरकारविरोधात लोकांच्या मनात राग निर्माण झाला आहे. त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आहे. ते स्वतःहून कामाला लागतात, घराघरात जाऊन देणग्या गोळा करतात. पक्षासाठी काम करतात. ही लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध जनता अशी होत आहे. काँग्रेसच्या वतीने लोक निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसवर अन्याय झाल्याचे त्यांना दिसू लागल्याने काँग्रेस आणि ‘इंडिया’तील घटक पक्षांना मजबूत करत आहेत.

महाराष्ट्रामध्ये निवडणूक अधिक गुंतागुंतीची असून महाविकास आघाडीला किती यश मिळेल?

खरगे- महाविकास आघाडीला लोकांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असल्याचे मी अनुभवलेले आहे. यावेळी राज्यातील बहुसंख्य जागा आम्हालाच मिळतील. महायुतीला एकही जागा मिळणार नाही असे म्हणता येत नाही म्हणून त्यांना अत्यल्प जागा मिळतील असे मी म्हणतो. लोक स्वतःहून मतदानामध्ये सहभागी होऊन महाविकास आघाडीला जिंकून देत आहेत. २०१९ मध्ये लोकांचा असा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला नव्हता पण, यावेळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे इतर राज्यांमध्येही लोकांमुळे ‘इंडिया’ आघाडीसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे.

हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : कल्याण- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरे गटाचे आव्हान कितपत?

राज्यात मराठा-ओबीसीचा मुद्दा वादग्रस्त ठरला, कांदा उत्पादकांचा प्रश्न गंभीर बनला. अशा महायुतीविरोधातील मुद्द्याचा महाविकास आघाडीला फायदा मिळला का?

खरगे- राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळे प्रश्न असून त्यानुसार आम्ही प्रचाराची दिशा निश्चित केली होती. राज्यातील प्रश्नांवर शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रचारांमध्ये हे मुद्दे राज्यातील नेत्यांनी सातत्याने मांडलेले असून त्याचा लाभ मिळालेला दिसेल.

२०१९ मध्ये काँग्रेसला राज्यातून फक्त एक खासदार लोकसभेत पाठवता आला, यावेळी परिस्थिती खरोखर बदलेल का?

खरगे- आत्ता जागांचा आकडा जाहीरपणे सांगणे योग्य ठरणार नाही. पण, जास्तीत जास्त जागा मिळवून राज्यात काँग्रेस मजबूत झालेला असेल. त्यापेक्षाही महायुतीतील तीनही पक्षांना लोक नाकारत आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यातून अजित पवार का फुटले? या लोकांना भाजपने सत्तेचेही लालूच दाखवले आणि ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याची भीतीही दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अख्खे आयुष्य काढणारे हे नेते म्हणून तर पळून गेले आणि भाजपला मिळाले.

हेही वाचा…उमेदवारांची भूमिका- दक्षिण मध्य मुंबई; पुनर्वसनातून धारावीकरांचा फायदाच होईल- राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट)

उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली होती वगैरे बोलून मोदी ठाकरेंची अप्रत्यक्षपणे मनधरणी करू लागल्याचे मानले जात आहे…

खरगे- कर्नाटकचे तत्कालीन काँग्रेस नेते एम. कृष्णा यांना पक्षाने मुख्यमंत्री केले, परराष्ट्रमंत्री केले. इतकी पदे दिल्यानंतरही ते भाजपमध्ये गेले. ते अतिदक्षता विभागात असल्याचे कळल्यावर मी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. आजारी असताना विचारपूस करणे ही सभ्यता असते. त्याची वाच्यता करणे चुकीचे आहे. त्याचे राजकारण करायचे नसते.

शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे छोटे-छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील का?

खरगे- शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मत मांडले असले तरी निवडणुकीच्या काळात त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. भाजपविरोधात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी ही बाब निश्चितच लाभदायी ठरेल. मतविभागणी टळू शकेल.

हेही वाचा…उमेदवारांची भूमिका – उत्तर मुंबई; ‘ पॅराशूट ’ उमेदवार जनतेचे प्रश्न सोडविणार नाही – भूषण पाटील, काँग्रेस

मोदींनी भाजपच्या नव्हे तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा अधिक प्रचार केला असे नाही का वाटत?

खरगे- आम्ही खूप विचारपूर्वक जाहीरनामा तयार केला आहे. कार्यकारिणीतील समितीच्या सर्व सदस्यांच्या समोर पी. चिदंबरम यांना जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द मी वाचायला लावला. मुद्दे माहीत नाही, ते समजले नाहीत असे कोणाही म्हणू नये यासाठी जाणीवपूर्वक मी हे केले होते. सदस्यांच्या शंकाकुशंका दूर केल्यानंतर जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. भाजपचा जाहीरनामा कोणी–कुठे लिहिला हे मोदींना तरी माहिती होते का? त्यांना भाजपचा जाहीरनामा वाचायला तरी वेळ मिळाला का? मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना निदान त्यातील मुद्दे तरी नीट सांगायला हवे होते. पण, आमचा जाहीरनामा न वाचताच तो ‘मुस्लिम लीग’चा असल्याचा मोदींनी आरोप केला. मुस्लिम लीग संबंध काय? हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणासाठी मोदी जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी बोलत होते.

पण, आता मोदींनी घुमजाव करत ‘हिंदू-मुस्लिम’वर बोललो नाही असे ते म्हणू लागले आहेत…

खरगे- आधी तर तुम्ही बोलला आहात. प्रचारसभांमध्ये बोलत असाल तर त्यामागील हेतू उघड होतो.

हेही वाचा…‘मर्द को भी दर्द होता है!’ असे म्हणत एक अख्खा पक्षच उतरलाय निवडणुकीच्या रिंगणात

मतांचा अंतिम आकडा देण्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने विलंब केल्याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने तुमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणे योग्य होते का?

खरगे- मी आयोगावर आरोप करत नाही पण, त्यांच्याकडून चूक झाली असेल तर त्यांनी मान्य केली पाहिजे. चूक दुरुस्त करा, एकमेकांवर टीका करून काय मिळणार? मी “इंडिया’तील घटक पक्षांना पत्र लिहिले होते. अंतर्गत गोष्टींवर आयोगाने जाहीरपणे टिप्पणी करणे योग्य नव्हते.

सुरत-इंदौरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांची पळवापळवी झाली. तिथे भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला. तिथे मतदानाची प्रक्रिया न घेणे आयोगाची चूक मानावी का?

खरगे- लोकशाही टिकवण्यासाठी इथली निवडणूक पुढे ढकलायला हवी होती किंवा मतदान घ्यायला हवे होते.

हेही वाचा…राम मंदिरानंतर ‘कृष्ण मंदिरा’साठी भाजपाला हव्या चारशेपार जागा?

काँग्रेसला ही पळवापळवी रोखता का आली नाही?

खरगे- त्यावेळी आमचा उमेदवार समोर असता तर त्याला रोखू शकलो असतो. त्याला निवडणूक लढवायची नव्हती तर आम्ही दुसरा उमेदवार उभा केला असता. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर आमचा उमेदवार गायब झाला, त्याने फोनही उचलला नाही. नवा उमेदवार देण्यासाठी आमच्या कडे वेळ नव्हता.

दरमहा १० किलो मोफत धान्य देण्याची घोषणा खूप उशिरा केली असे वाटत नाही का?

खरगे- या घोषणेला थोडी उशीर झाला हे मान्य. ओदिशासारख्या राज्यामधील आदिवासी भागांतील दुरवस्था पाहिल्यानंतर दहा किलो मोफत धान्य देण्याची गरज वाटू लागली. केंद्रात ‘इंडिया’ची सत्ता आल्यावर हे आश्वासन तातडीने पूर्ण केले जाईल. कर्नाटक-तेलंगणामध्ये आम्ही ही योजना लागू केली आहे.

हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्धच झाला नाही!

‘इंडिया’ची सत्ता आली तर बाहेरून पाठिंबा देऊ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. अशा विधानाने ‘इंडिया’ आणखी कमकुवत होईल असे वाटते का?

खरगे- मोदींचे सरकार नको असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. ममतांनीही तसे आश्वासन दिलेले आहे. तृणमूल काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही या सगळ्या चर्चा बहुमत मिळाल्यावर केल्या जाऊ शकतात. ‘यूपीए’ सरकारला कम्युनिस्ट पक्षांनी बाहेरूनच पाठिंबा दिला होता.

भाजपने संस्थांची स्वायत्तता, विश्वासार्हतेला धक्का दिल्याचा आरोप काँग्रेस करत असून सत्ता आली तर काय बदल कराल?

खरगे- आंबेडकर म्हणाले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक वाईट असतील संविधानचा काही उपयोग होणार नाही. पण, सत्तेतील लोक चांगले असतील तर सुमार दर्जाच्या संविधानाचा उत्तमरित्या उपयोग करता येऊ शकतो. हे मी उदाहरण देऊन स्पष्ट करतो. डॉ. लोहिया एक-दोन निवडणूक जिंकल्यानंतर पराभूत झाले. त्यांना मिळणारी मदतही कमी झाली होती. पं. नेहरूंनी त्यांना जीप आणि २५ हजार रुपयेही दिले. लोकशाहीमध्ये सशक्त विरोधक असला पाहिजे या भूमिकेतून पं. नेहरूंनी लोहियांना ही मदत केली होती. लोहियांनी पैसे देणगी म्हणून ठेवून घेतले, जीप मात्र परत केली. लोहियांसारख्या कट्टर टीकाकारांनाही नेहरूंनी मदत केली. हे औदार्य आत्ता दिसते का? लोकांनी दिलेल्या देणग्या आमच्या कडून काढून घेतल्या गेल्या आहेत. चांगले लोक सत्तेत आले तर प्रशासनही चांगले होते. बदला घेण्याच्या भावनेने सत्ता राबवली तर काहीच चांगले होऊ शकत नाही.

रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्याचा निर्णय धोरणात्मक होता की, अखेरच्या क्षणी घेतला गेला?

खरगे- धोरणात्मक निर्णय नाही पण, रायबरेलीतून गांधी कुटुंबातील सदस्य खूप पूर्वीपासून निवडणूक लढवत आहेत. सोनिया गांधींनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा पक्षांतील अनेकांनी राहुल गांधींना रायबरेलीतून उभे राहण्याची विनंती केली. गांधी कुटुंबाची परंपरागत जागा सोडून देणे योग्य नव्हे असे अनेकांचे म्हणणे होते. रायबरेलीतून लढले पाहिजे असे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितल्यानंतर राहुल गांधी लढण्यासाठी तयार झाले.

हेही वाचा…उमेदवारांची भूमिका- वायव्य मुंबई : दिल्लीचे आकर्षण नव्हते, पण… – रवींद्र वायकर

विजयानंतर राहुल गांधींनी रायबरेलीतून राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी-वाड्रा तिथून लढतील का?

ते मला माहीत नाही.