Premium

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मोपलवार राजकारणात ?

मोपलवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवरर्तीयांकडून सांगण्यात आले.

advisor, chief minister radheshyam mopalwar, politics, bjp, hingoli lok sabha constituency
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मोपलवार राजकारणात ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील पायाभूत सुविधांशी संबंधित वॅार रुमचे सल्लागार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ववस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार हे लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. नांदेड अथवा हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोपलवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवरर्तीयांकडून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन संपल्यावर ते सरकारी पद सोडणार आहेत. कोणतीही तांत्रिक बाब येऊ नये यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा सादर केला आहे.

हेही वाचा… मित्रपक्षावर कुरघोडी करत गंगाखेड मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणी

हेही वाचा… विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात भाजपाच्या सभा; आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू

मोपलवार हे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. मोपलवार बहुधा हिंगोली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जाते. फडणवीस मुऱख्यमंत्री असताना मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. पण सरकारने त्यांना पाठीशी घातले होते. फडणवीस यांचा महत्वाकांक्षी समृद्धी प्रकल्प मोपलवार यांनी मार्गी लावला होता. फडणवीस सरकार, महाविकास आघाडी आणि शिंदे सरकारच्या काळात मोपलवार हे सत्ताधाऱ्यांचे विश्वासू ठरले आहेत. निवृत्तीनंतर गेली पाच वर्षे ते सरकारमध्ये कायम आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Advisor to chief minister radheshyam mopalwar in politics print politics news asj

First published on: 29-11-2023 at 15:37 IST
Next Story
मित्रपक्षावर कुरघोडी करत गंगाखेड मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणी