scorecardresearch

नागपूर:भाजपचा गड सर करणारे अडबाले कोण आहेत

बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करून नागपूर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले सुधाकर अडबाले आहेत कोण याबाबत उत्सुकता आहे.

Sudhakar Adbale
सुधाकर अडबाले

भाजपचा गड सर करणारे अडबाले यांनी दीड वर्षापासूनच केली होती तयारी

बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करून नागपूर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले सुधाकर अडबाले आहेत कोण याबाबत उत्सुकता आहे.सुधाकर अडबाले मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मुळात कॉंग्रेस विचारसरणीचे असलेले अडबाले सुरूवातीपासून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळले आहेत. यापूर्वी त्यानी ही निवडणूक लढवण्याची इछा संघटनेकडे व्यक्त केली होती. पण त्यांना संधी नाकारली. कालांतराने संघटनेत फुट पडली पण अडबाले मुळ संघटनेशी जुळून राहिले. यावेळी निवडणूक लढवायची ठरवून ते कामाला लागले. संघटनेतील दोन्ही गटात मिलाफ घडवून आणला.२२ मार्च २०२१ रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची बैठक पार पडली. बैठकीला नागपूर शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार डी. यू. डायगव्हाणे, प्रांत अध्यक्ष श्रावण बरडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, शिक्षक मंडळाचे सदस्य जगदीश जुनगरी यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यवाहक उपस्थित होते. तेथेच अडबाले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा >>>उत्पादन शुल्क घोटाळ्यातील आरोपपत्रात अरविंद केजरीवालांचं नाव; भाजपाची थेट राजीनाम्याची मागणी, ‘आप’च्या अडचणी वाढणार?

यंदा अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दीड वर्षांपूर्वीच अडबाले यांनी तयारीला सुरुवात केली होती. दीड वर्षांच्या कालावधीत सहाही जिल्ह्यात संपर्क, समविचारी संघटना, समविचारी पक्षाशी जुळवून घेत अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. अडबाले यांनी आतापासून तयारी केल्यास कुणीही पराभव करू शकणार नाही असं डायगव्हाणेंनी त्याचवेळी सांगितलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर अडबाले यांनी मागे वळून न पाहता थेट विजयापर्यंत मजल मारली. मागील १० वर्षांपासून या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी ते आंदोलन करत आहेत. हाच मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरले होते.

हेही वाचा >>>“बाबरला हटवून राम मंदिर बांधलं…”, आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, दिलेलं वचन आम्ही पाळलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करूच शकत नाही. परंतु ज्या-ज्या राज्यांमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे त्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मान्य केलं आहे. हे ते शिक्षकांना पटवून देण्यात अडबाले यशस्वी झाले.नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड होता. डी.यू. डायगव्हाणे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. २०११ मध्ये भाजपकडे गेलेली जागा परत मिळवण्यात शिक्षक संघाला यश आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:43 IST
ताज्या बातम्या