Lok Sabha Election 2024 अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. काँग्रेसकडून या जागांवर कोण निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसने आज सकाळी अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सकाळी ७.५० ला काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून दोन नावे जाहीर केली.

त्यात पक्षाने अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांच्या विरोधात केएल शर्मा यांना मैदानात उतरवले आहे. तर राहुल गांधी हे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ही यादी जाहीर होताच, जे नाव चर्चेत येत आहे, ते आहेत केएल शर्मा. काँग्रेसचे आणि गांधी घराण्याचे एकनिष्ठ समजले जाणारे केएल शर्मा कोण आहेत? त्यांना उमेदवारी देण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घेऊयात.

Shiv Sena Thackeray group candidate Arvind Sawant got less votes from Worli and Shivdi assembly constituencies Mumbai
सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य; मुंबादेवी, भायखळ्यातील मताधिक्यामुळे विजय सुकर
Vishwajit Kadam, Jayant Patil,
विश्वजित कदमांची जयंत पाटील यांच्यावर मात ?
ramtek lok sabha marathi news
भाजप आमदारांच्या मतदारसंघातच शिवसेनेला फटका…बावनकुळेंच्या कामठीतही…
Prakash Ambedkar, akola,
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण जनतेने ओळखले; काँग्रेस पाडण्यासाठीच… डॉ. अभय पाटील यांची टीका
Smriti Irani Amethi Result
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी
Rahul Gandhi Lok Sabha Election Result 2024
मोठी बातमी! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी
Only 942 votes for Kishore Gajbhiye in the first round
वंचित आघाडीला झटका, पहिल्या फेरीत किशोर गजभिये यांना केवळ ९४२ मते
Indira Gandhi assassin son loksabha election
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा निवडणुकीतील प्रचारामुळे चर्चेत; कारण काय?

हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?

सोनिया गांधी यांचे विश्वासू केएल शर्मा

अमेठीसह रायबरेलीतूनदेखील गांधी कुटुंबातील सदस्यच निवडणूक लढवेल असे बोलले जात होते. यंदा राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ अमेठीतून निवडणूक न लढवता रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशी चर्चा होती की, अमेठीतून प्रियंका गांधी वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. परंतु, यंदा प्रियंका गांधी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ मे म्हणजेच आज आहे. मध्यरात्रीपासून काँग्रेसच्या बाजूने एका नावाची चर्चा सुरू होती, ते नाव होते केएल शर्मा म्हणजेच किशोरीलाल शर्मा. सकाळी पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. किशोरीलाल शर्मा हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जातात. सोनिया रायबरेलीच्या खासदार असताना शर्मा त्यांचे खासदार प्रतिनिधी होते.

किशोरी लाल शर्मा दीर्घकाळापासून अमेठी आणि रायबरेली या दोन्ही भागात काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी त्यांना अमेठीतील उमेदवाराविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच अमेठीतून उमेवाराची घोषणा होईल.

राजीव गांधींशी कनेक्शन

किशोरी लाल शर्मा हे पंजाबमधील लुधियानाचे मूळ रहिवासी आहेत. १९८३ च्या सुमारास राजीव गांधी यांनी शर्मा यांना पहिल्यांदा अमेठीत आणले. अगदी तेव्हापासून शर्मा अमेठीत स्थायिक झाले. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंबाने येथून निवडणूक लढवणे बंद केले होते. मात्र, तेव्हाही शर्मा यांनी काँग्रेस पक्षाच्या खासदारासाठी काम करणे सुरूच ठेवले. त्यामुळे किशोरीलाल शर्मा यांचा अमेठी आणि रायबरेलीशी संबंध कायम राहिला.

रायबरेलीतून खासदार राहिलेल्या दिवंगत शीला कौल आणि अमेठीचे खासदार राहिलेले दिवंगत सतीश शर्मा यांचे कामही त्यांनी पाहिले. ते बिहार काँग्रेसचे प्रभारी राहिले आहेत. किशोरी लाल शर्मा हे एक रणनीती-कुशल आणि संघटनात्मक नेते मानले जातात. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि पंजाब कमिटीसाठीही काम केले आहे. किशोरी लाल शर्मा यांच्या कुशलतेबद्दल बोलायचे झाल्यास अमेठीतून निवडणूक लढवणार असूनदेखील ते रायबरेलीतून राहुल गांधी यांचे काम बघणार आहेत.

हेही वाचा : लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?

उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली मतदारसंघ हे गांधी कुटुंबाचे परंपरागत मतदारसंघ आहेत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी अमेठी आणि केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली होती. वायनाड येथील जागा राहुल गांधींनी जिंकली. पण, काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाणारी अमेठीची जागा राहुल गांधी यांना जिंकता आली नाही. आता आपला बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसने आपल्या विश्वासू नेत्याला उमेदवारी दिली आहे. रायबरेली मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता.