scorecardresearch

वायएस शर्मिला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात; पदयात्रेची परवानगीही केली रद्द

तीन महिन्याच्या कालावधीत तिसऱ्यांदा पोलिसांनी घेतलं ताब्यात

Y S Sharmila detained
(फोटो-पीटीआय)

तेलंगणा पोलिसांनी रविवारी युवजन श्रमिक रायथू तेलंगमा पार्टीच्या (YSRTP) प्रमुख वायएस शर्मिला यांना ताब्यात घेतले. महबूबाबादच्या आमदार आणि बीआरएस नेते शंकर नाईक यांच्याविरोधात कथितरित्या अयोग्य टिप्पणी केल्याब्दल त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याचबरोबर त्यांच्या प्रजाप्रस्थानम पदयात्रेला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांना तिसऱ्यांदा ताब्यात घेण्यात आलं आहे.

महबूबाबाद शहरात कोणत्याही प्रकाराचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना पोलिसांनी हैदराबादला हलवलं आहे. याशिवाय पोलिसांनी शर्मिला यांच्याविरोधात विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी एक सभेत बोलताना शर्मिला यांनी महबूबाबादचे आमदार दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचा आरोप करत, अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या या विधानानंतर भारत राष्ट्र समितीने शर्मिला यांच्याबद्दल जिल्हाभर धरणे आंदोलन केले होते. रस्त्यावर उतरून आंदोलक शर्मिला परत जा अशी घोषणाबाजी करत होते, शिवाय होर्डिंग्ज जाळून YSTRP प्रमुख यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता.

तेलंगणात यावर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) घेरण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पक्ष ( वाएसआरटीपी ) यांनी तयारी केली आहे. अशातच ‘वाएसआरटीपी’च्या सर्वेसर्वा वायएस शर्मिला यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर केसीआर यांनी माझ्याबरोबर पदयात्रेत सहभागी व्हावं. राज्यात काही समस्या नसतील, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं आव्हान वायएस शर्मिला यांनी दिलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाय एस शर्मिला यांनी पदयात्रा काढली आहे. “राज्यात सर्वजण सुखात आहेत. कोणतीही समस्या नाही,” असं विधान केसीआर यांनी केलं होतं. त्यावरून वाय एस शर्मिला यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 14:36 IST
ताज्या बातम्या