संजय मोहिते

दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा रणसंग्रामाची आतापासून तयारी करणारा भाजप २०२४ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे. तब्बल ३३ वर्षानंतर बुलढाण्याच्या लढतीत भाजप आपली ताकद आजमावणार आहे. आजवरच्या काळात फारसे चांगले ‘ ट्रॅक रेकॉर्ड ‘ नसलेला भाजप या निवणुकीत कशी कामगिरी करतो हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
BJP, Sharad Pawar group, ahmednagar,
नगरमध्ये धनगर समाजाची मते आकर्षित करण्यावर भाजप, शरद पवार गटाचा भर
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनसंघाने मलकापूर व खामगाव मतदारसंघात विजय प्राप्त केला! मात्र लोकसभा लढतीत पक्षाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. अर्थात १९९६ पासून पक्षाने हा मतदारसंघ शिवसेनेला बहाल केला. यामुळे तीन वेळाच पक्षाने निवडणूक लढविली आहे. १९९१ च्या लोकसभा लढतीत ‘ कमळ’ चिन्ह होते. त्या लढतीत पक्षातर्फे उच्च शिक्षित पी. जी. गवई हे उमेदवार होते. त्यांनी १ लाख ७६ हजार ४०४ मते मिळवत मुकुल वासनिक( २ लाख १३ हजार ४९५ मते) यांना अयशस्वी झुंज दिली.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर

एकमेव विजय

१९८९ च्या निवडणुकीत सुखदेव नंदाजी काळे या सामान्य उमेदवाराने भाजपचा एकमेव विजय साकारला. त्यांनी खासदार मुकुल वासनिकांचा दारूण पराभव केला. सन १९८४ च्या लढतीत भाजपने माजी खासदार दौलत गवई यांना मैदानात उतरवले. मात्र बाळकृष्ण वासनिक यांनी त्यांचा एकतर्फी पराभव केला. १९९६ पासून २०१९ पर्यंत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्यात राहिला. यामुळे तीन लढतीत १ विजय व २ पराभव अशी भाजपची कामगिरी राहिली. आता तीन दशकानंतर भाजपने ताकदीने बुलढाण्यावर आपला दावा केला आहे . मिशन ४५ मध्ये बुलढाण्याचा समावेश करून पक्षाने सहकारी शिंदे गटाला बुचकळ्यात पाडले आहे. २०२४ चा खासदार भाजपाचाच असा दावा करण्यात येत आहे. यामुळे असे झालेच तर तब्बल ३३ वर्षानंतर बुलढाण्याच्या रणसंग्रामात कमळाचे दर्शन होणार आहे. मात्र उमेदवार पक्षाचा की शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे अजून गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा… मोहोळांना बढती, पुण्यातून खासदारकीची उमेदवारी ?

पहिल्यांदा लढताना १९८४ मध्ये पक्षाने रिपाई चळवळीतील आघाडीचे नेते तथा माजी खासदार दौलत गवई यांची निवड केली. १९८९ मध्ये सुखदेव काळे यांना उमेदवारी देतांना त्यांनी ८४ मध्ये मिळालेली (१ लाख १८ हजार मते) मते व साधेपणा हा निकष होता. १९९१ मध्ये दिल्लीचे माजी नायब राज्यपाल पी. जी .गवई यांना उमेदवारी देण्यात आली. आता तर पक्ष अधिक बळकट झाल्याने उमेदवार तगडाच राहणार हे उघड आहे. पण तो पक्षाचा की मित्र पक्षाचा हे ऐनवेळीच कळेल याची दक्षता पक्षाने घेतली आहे.