आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये राजस्थानमधील १५ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने कोटामधून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, नागौरमधून ज्योती मिर्धा यांना, तर बांसवाडामधून महेंद्रजीत सिंग मालवीय यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी ज्योती मिर्धा या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, तर मालवीय यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

राजस्थानमधील जातीय समीकरणे आणि स्थानिक राजकारण बघता, भाजपाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषत: नागौर, करौली-धोलपूर आणि बांसवाडा या तीन जागांवर भाजपाला कडवी झुंज बघायला मिळू शकते. राजस्थानमध्ये लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. त्यापैकी चार जागा अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर तीन जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. २०१४ मध्ये भाजपाने २४ जागांवर, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर विजय मिळवला होता.

Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Uddhav thackeray
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी

हेही वाचा – पंजाबमधील सुखविलास रिसॉर्टचा वाद काय? मुख्यमंत्री मान यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजपावर काय आरोप केले?

नागौर

नागौरमध्ये जाट लोकसंख्या सर्वाधिक आहे. येथील विद्यमान खासदार तथा आरएलपी नेता हनुमान बेनिवाल हे स्वत: जाट समाजातून येतात. तसेच तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियतादेखील प्रचंड आहे. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

या संदर्भात बोलताना भाजपाचे नेते म्हणाले, “नागौर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या ठिकाणी जाट समाज हा जवळपास ७० टक्के आहे, त्यामुळे या जागेवर सहसा जाट समाजाच्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाते. मात्र, नागौरमध्ये भाजपाकडे जाट समाजाचा प्रभावशाली नेता नाही, त्यामुळे ज्योती मिर्धा यांना उमेदवारी दिली आहे. या भागात मिर्धा यांचा प्रभाव असून त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो.

२०१९ मध्ये भाजपा आणि आरएलपी यांची युती होती, त्यामुळे भाजपाने नागौरची जागा आरएलपीसाठी सोडली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या निवडणुकीत भाजपा-आरएलपी युतीची घोषणा अद्यापही झालेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरएलपीने केवळ एका जागेवर विजय मिळवला असला, तरी त्यांचा या भागात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपा आणि आरएलपी यांच्यात मोठी लढत बघायला मिळू शकते.

करौली-धोलपूर

याशिवाय करौली-धोलपूर लोकसभेच्या जागेवरही भाजपाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. २०२३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत यापैकी भाजपाने २, काँग्रेसने ५ आणि बसपाने एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. या भागात स्थानिक नेत्यांचा चांगला प्रभाव आहे.

भाजपाच्या नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, ”करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघात जवळपास तीन लाख जाट मतदार आहेत, यापैकी अनेकांचा काँग्रेसच्या अनिता जाटव यांना पाठिंबा आहे. या शिवाय या भागात माळी समाजही बहुसंख्य आहे. या भागातील वैश्य समाजही नेहमीच भाजपाची वोटबॅंक राहिली आहे. मात्र, राजखेरा येथील काँग्रेसचे आमदार रोहित बोहरा यांची या भागात चांगली पकड आहे.”

हेही वाचा – पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

बांसवाडा

बांसवाडा भागात काँग्रेससह भारतीय आदिवासी पक्षाचा (बीएपी) प्रभाव आहे. ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या भागात आदिवासी समाज बहुसंख्येने आहे, त्यामुळे या जागेवरही भाजपाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, भाजपासाठी दिलासादायक बाब म्हणजे, भाजपाने महेंद्र जीतसिंग मालवीय यांना उमेदवारी दिली आहे. मालवीय हे पूर्वी काँग्रेसचे आमदार होते, मात्र आता ते भाजपात आहेत. या भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे, याचा थोडा फार फायदा भाजपाला होऊ शकतो.

या संदर्भात बोलताना भाजपाचे नेते म्हणाले, “या भागात भारतीय आदिवासी पक्ष आणि काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या जागेवरील लढत भाजपासाठी म्हणावी तशी सोपी नाही.” तर ”या तिन्ही जागांसाठी भाजपाने विशिष्ट रणनीती आखली आहे. नक्कीच या जागेवर आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, मात्र त्यासाठी आम्ही तयार आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी दिली.