अवघ्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा ओडिशाच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान ५ मार्च रोजी येथील विविध सरकारी प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि पायाभरणीसह चंडीखोल येथे भाजपाच्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ५ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यादरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सत्ताधारी बिजू जनता दला(BJD)बरोबर युती जाहीर करतात की नाही हा प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे.

१९९८-२००९ दरम्यान युतीत असलेले दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या आगामी युतीवर भाष्य करण्याचे टाळत आहेत, परंतु पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण बीजेडीने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली, कारण भाजपाकडे त्यांची निवड निश्चित करण्यासाठी संख्याबळ कमी होते.

पंतप्रधान मोदींच्या ओडिशा दौऱ्याची वेळ महत्त्वाची आहे. कारण ५ मार्च रोजी बीजेडी सुप्रीमो आणि सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वडील आणि ओडिशाचे आयकॉन, माजी मुख्यमंत्री दिवंगत बिजू पटनायक यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. बीजेडीने हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे आणि पंतप्रधान त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यात बिजू पटनायक यांना श्रद्धांजली वाहतील, अशी अपेक्षा आहे. ते मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठही शेअर करण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; कोणाला संधी मिळणार?

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ५ मार्च रोजी दुपारी भुवनेश्वरला पोहोचतील. पुढे जाऊन ते जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल येथे विविध प्रकल्पांचे शुभारंभ करतील. यानंतर मोदी प्रदेश भाजपाने आयोजित केलेल्या सभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांची या वर्षातील ही दुसरी ओडिशा भेट आहे; ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी संबलपूर येथे प्रकल्पांचे अनावरण केले, तेव्हा त्यांनी शेवटचा राज्याचा दौरा केला होता. त्यानंतरही त्यांनी पटनायक यांना आपला मित्र म्हणत मंच शेअर केला होता. भारताला आर्थिक शक्तिस्थान बनवण्याची नवी दिशा ठरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोदींचे कौतुक केले होते. राज्यात भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष असतानाही बीजेडी २४ वर्षांपासून राज्य करीत आहे, पंतप्रधानांनी पटनायक किंवा त्यांच्या सरकारवर टीका केली नाही हे दोन्ही बाजूंमधील घनिष्ठ संबंध दर्शवितात.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात तळ ठोकून बसलेल्या भाजपाच्या ओडिशा निवडणूक सह प्रभारी लता उसेंडी यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, ओडिशात डबल इंजिन सरकार असेल. बीजेडी पुन्हा एनडीएमध्ये परतणार का? यावर त्यांनी बोलणे टाळले. “जोपर्यंत ओडिशाचा संबंध आहे, तोपर्यंत तेथे दुहेरी इंजिन सरकार राहणार आहे. डबल इंजिन सरकार ओडिशाचा विकास तेथील लोकांच्या इच्छेनुसार करेल,” असेही त्या म्हणाल्यात. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, स्थानिक कार्यकर्त्यांना सर्वोच्च स्तरावरील चर्चेची माहिती नव्हती. ओडिशातील केंद्रीय मंत्र्यांनाही काय चालले आहे, याची माहिती नाही. जेव्हा ओडिशाच्या रणनीतीचा विचार केला जातो, तेव्हा केंद्रीय नेतृत्वाचे विवेकपूर्ण मौन हे गोंधळ निर्माण करते,” असंही त्यांनी सूतोवाच केले.

हेही वाचाः संदेशखाली प्रकरणामुळे तृणमूलची चांगलीच अडचण, वाचा नेमकं कारण काय?

ते म्हणाले की, राज्य भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला कळवले आहे की, आगामी निवडणुकांसाठी ते बीजेडीशी सामना करू शकतात. “आम्ही केंद्रीय नेतृत्वाला आधीच सांगितले आहे की, बीजेडीच्या विरोधात जोरदार सत्ताविरोधी शक्ती आहे आणि नेतृत्वाच्या पाठिंब्याने आम्ही ते चांगल्या प्रकारे तयार केलेल्या रणनीतीने भरून काढू शकतो. पण नेतृत्वाला लोकसभा निवडणूक जिंकण्याची जास्त काळजी असल्याचे दिसते. ते बीजेडीकडे ४०० जागा जिंकण्याच्या त्यांच्या लक्ष्याच्या अनुषंगाने संभाव्य सहयोगी म्हणून पाहू शकतात,” असे भाजपा नेते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केलेली नाही, असेही भाजपा नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, बीजेडीचे दोन बंडखोर नेते आणि विद्यमान आमदार प्रदीप पाणिग्रही आणि प्रशांत जगदेव यांनीही गेल्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे बीजेडी नेतेदेखील त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करीत नाहीत.

२५ फेब्रुवारी रोजी पटनायक यांचे विश्वासू सहकारी आणि माजी आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन, जे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बीजेडीमध्ये सामील झाले होते, त्यांनी देखील चर्चा कमी करण्याचा प्रयत्न केला. पांडियन म्हणाले की, “अशा विषयांवर सार्वजनिक मंचांवर चर्चा होत नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने बीजेडी विरुद्ध आक्रमकपणे लढा दिला असला तरी त्यांना यश मिळू शकले नाही. पक्षाने राज्याच्या २१ पैकी आठ लोकसभेच्या जागा मिळवल्या, तर बीजेडीला १२ जागा मिळाल्या. १४७ सदस्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मात्र केवळ 23 जागा जिंकता आल्या, तर बीजेडीला ११३ जागा मिळाल्या.तेव्हापासून भाजपाने ओडिशात बीजेडीशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. बीजेडीने संसदेतील महत्त्वाच्या विधेयकांवर आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोदी सरकारला पाठिंबा दिल्याने हे दिसून आले.

भाजपा अन् बीजेडीची युती झाल्यास निवडणूक तिकिटांबाबत वरिष्ठ नेते चिंतेत?

या दोन्ही पक्षांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी युती केली होती. बीजेडी १२ जागांवर लढली होती आणि नऊ जिंकली होती, तर भाजपाने ९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि ७ जागा जिंकल्या होत्या. त्यांनी पहिल्यांदा २००० मध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती, जेव्हा बीजेडी आणि भाजपा अनुक्रमे ८४ आणि ६३ जागांवर लढले होते. २००४ मध्येही त्यांनी समान जागावाटपाची पुनरावृत्ती केली. बीजेडीने २००९ च्या निवडणुकीपूर्वीच युती तोडली होती. दरम्यान, ओडिशा भाजपाचे अध्यक्ष मनमोहन सामल यांनी बीजेडीबरोबरचे युतीचे वृत्ता फेटाळले. दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना समल म्हणाले की, भाजपा सर्व २१ लोकसभेच्या जागा आणि १४७ विधानसभा मतदारसंघांत जोरदारपणे लढणार आहे. “आम्ही ओडिशातील सर्व लोकसभेच्या २१ जागा जिंकू. आमच्या सर्वोच्च नेतृत्वानेही पक्ष ओडिशात सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे,” असा दावा त्यांनी केला.

Story img Loader