नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीतील विजयामुळे भाजपाचे मनोबल वाढलेले आहे. असे असतानाच आता भाजपाला आगामी वर्षात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच योजना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंड्या येथे काँग्रेस आणि जेडीएस पक्षांवर टीका केली. शाह यांनी या सभेच्या माध्यमातून भाजपाच्या प्रचाराला सुरवात केल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींकडून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा; मात्र, ममता बॅनर्जींचा व्यासपीठावर जाण्यास नकार, नेमकं काय घडलं?

अमित शाहा यांनी जनसंकल्प यात्रेच्या माध्यमातून मंड्या येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि जेडीएस पक्षावर टीका केली. शाह यांनी हे पक्ष जातीवादी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप केला. “मंड्या आणि म्हैसूर या भागातील लोकांनी काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांना यापूर्वी संधी दिलेली आहे. मात्र यावेळी या भागाने भाजपाला मते द्यावीत. आपण या दोन्ही पक्षांचे शासन अनुभवलेले आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा येथील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीमधील लोकांसाठी एटीएम म्हणून काम केले. तर जेडीएस सत्तेत असताना येथील नेत्यांनी एका परिवारासाठी एटीएम म्हणून काम केले,” अशी टीका अमित शाहा यांनी केली. गांधी परिवार आणि देवेगौडा परिवाराला लक्ष करण्याच्या उद्देशाने शाह यांनी वरील विधान केले.

हेही वाचा >> अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून महाविकास आघाडीतच मतभेद

अमित शाह यांनी राम मंदिर आणि पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) संदर्भ देत काँग्रेस आणि जेडीएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाईल, अशी घोषणा केली. काँग्रेसने मंदिर उभारणीसाठी उशीर कसा होईल, यासाठी प्रयत्न केल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा >> त्रिपुरामध्ये भाजपाच्या सातव्या आमदाराचा राजीनामा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आगामी निवडणूक लक्षात घेता भाजपा म्हैसूर आणि मंड्या या भागात आपले प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात वोक्कालिगा समाजाचे लोक जास्त प्रमाणात आहेत. यापूर्वी वोक्कालिगा समाजाचे मतदार काँग्रेस आणि जेडीएस पक्षासोबत राहिलेले आहेत. त्यामुळे या समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे.