समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संसद भवनाजवळील मशि‍दीला अलीकडेच भेट दिली. त्यावरून बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपा नेत्यांनी समाजवादी पक्षावर धार्मिक स्थळांचा वापर राजकीय बैठका घेण्यासाठी केल्याचा आरोप केला जात आहे. या भेटीदरम्यान समाजवादी खासदार आणि अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यादेखील होत्या. त्यावेळी डिंपल यादव यांनी मशिदीत घालण्यास योग्य नसणारा पोशाख परिधान केल्याचे भाजपा नेत्याने म्हटले आहे. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर हा वाद आणखी वाढला.

अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या या भेटीबाबत भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी आरोप केला आहे की, अखिलेश यादव यांनी एका धार्मिक स्थळाचे समाजवादी पक्षाच्या अनौपचारिक कार्यालयात रूपांतर केले आहे.

डिंपल यादव यांच्या पोशाखावर प्रश्न का?

याबाबत बोलताना जमाल सिद्दीकी यांनी म्हटले, “अखिलेश यादव काल मशिदीत गेले होते. ती मस्जिद संसद भवनासमोरची आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नदवी हे तिथले इमाम आहेत. आम्ही त्यांचाही निषेध करतो. मशिदीत राजकीय बैठक का आयोजित करण्यात आली होती?”
सिद्दीकी यांनी डिंपल यादव यांच्यावर वैयक्तिक आरोप केले आहेत. ते म्हणाले, “फोटोमध्ये डिंपल यादव साडी नेसून बसल्या आहेत. त्यांची पाठ, पोट दिसत आहे. त्याशिवाय त्यांनी डोक्यावर पदर घेतला नव्हता.”
सिद्दीकी यांनी म्हटले, “हे मशिदीच्या आचारसंहितेविरुद्ध आहे आणि जगभरातील इस्लामिक भावना दुखावणारं आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू. जर परिस्थिती अशीच राहिली, तर आम्हीसुद्धा त्याच मशिदीत एक बैठक आयोजित करू. ती बैठक राष्ट्रगीतानं सुरू होईल आणि राष्ट्रगीतानंच संपेल.”

दरम्यान, सिद्दीकी यांनी समाजवादी पक्षावर मशि‍दीचा मनोरंजनासाठी वापर केल्याचा आरोप केला आणि या भेटीदरम्यान त्यांनी देशविरोधी कारवायांवर चर्चा झाल्याचाही आरोप केला आहे.

अखिलेश आणि डिंपल यादव यांच्यावर टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही समाजवादी पक्षावर संविधानिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पाठक म्हणाले, “समाजवादी पक्ष नेहमीच संविधानाचे उल्लंघन करतो. भारतीय संविधानात म्हटले आहे की, आपण धार्मिक स्थळांचा वापर राजकीय हेतूंसाठी करू शकत नाही. परंतु, त्यांचा संविधानावर विश्वासच नाही.”

दुसरीकडे समाजवादी पक्षाने भाजपाच्या आरोपांचे खंडन केले आहे. असे असताना अखिलेश आणि डिंपल यादव दोघांनाही राजकीय बैठकीचे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच हा वाद महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डिंपल यादव यांची प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया देताना डिंपल यादव म्हणाल्या, “जे बोललं जात आहे तसं काहीही नाही. समाजवादी पक्षाचे खासदार इमाम नदवीजी यांनी आम्हाला बोलावलं होतं म्हणून आम्ही गेलो. भाजपा याबाबत गैरसमज पसरवत आहे. आम्ही कुठल्याही बैठकीसाठी गेलो नव्हतो. भाजपा हे सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी बोलत आहे. सरकारला जनतेशी संबंधित मुद्द्यांवर बोलणं टाळायचं आहे.”
दरम्यान, मैनपुरीचे खासदार यांनीही एसआयआर, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याचा आरोप भाजपावर केला आहे.

    अखिलेश यांचे भाजपावर आरोप

    अखिलेश यादव यांनीही यावर प्रत्युत्तर देत भाजपावर राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर शस्त्र म्हणून केल्याचा आरोप केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी तुमचे आभार मानतो; पण तुम्हीदेखील भाजपाच्या जाळ्यात अडकला आहात. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे श्रद्धा लोकांना एकत्र करते; मग त्यांचा धर्म कोणताही असो. कुठलीही श्रद्धा लोकांना एकत्र आणते आणि भाजपाला नेमकं हेच खटकतं. त्यांना एकता नको आहे.”

    महत्त्वाचे मुद्दे :

    • संसदेजवळील मशिदीला भेट देणाऱ्या अखिलेश यादव यांच्यावरून राजकीय वादळ
    • मशिदीतील पोशाखांबद्दल डिंपल यादव यांच्यावर टीका
    • समाजवादी पक्षाने आरोप फेटाळले आणि भाजपाचे दावे विचलित करणारे असल्याचे म्हटले
    • समाजवादी पक्ष फक्त मुस्लिम मतांसाठी काम करत आहे, तर समाजवादी पक्ष भाजपवर धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याचा आरोप करतो
    • वाद धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येवर, आणि धर्माचा राजकारणात वापर या मुद्द्यावर केंद्रित आहे

    इतर सपा नेत्यांनीही भाजपाच्या या टीकेचा निषेध केला आहे. सपा खासदार झिया उर रहमान बरक यांनी या वादाला निराधार असल्याचे म्हटले आहे. “मशिदीत कोणतीही राजकीय बैठक झाली नाही. संसदेत किंवा खासदारांच्या निवासस्थानी बैठका घेण्यासाठी जागा नाही का? ते मशिदीत बैठका का घेतील?”, असे ते म्हणाले. काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनीही भाजपाच्या या टीकेला लज्जास्पद ठरविताना, “मशि‍दीचे इमामदेखील खासदार आहेत. ते मशिदीत बसले, तर काय हरकत आहे? भाजपाला लाज वाटली पाहिजे. डिंपल यादव भारतीय संस्कृतीनुसार पोशाख करतात. भाजपा नेत्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे. ते महिलांचा अपमान करतात.”

    सपा हा कट्टर हिंदूविरोधी पक्ष : भाजपा प्रवक्ते

    This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

    भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष खूपच हिंदूविरोधी आहे. अखिलेश यादव संसदेजवळील मशिदीत राजकीय बैठका घेतात. हे तेच नेते आहेत, ज्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या भव्य उदघाटनावर बहिष्कार टाकला होता आणि राजकीय प्रकल्प असल्याची टीका केली होती