अविनाश पाटील

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण कायमच शेतकरीकेंद्रित राहिले आहे. त्यातही प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कायमच पवार यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादी दोन गटात विभागल्यानंतर बदललेल्या राजकारणात जिल्ह्यात पवार यांना पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्याची संधी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन आयतीच उपलब्ध करुन दिली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीच पेरणीयोग्य जमीन करुन दिल्यावर पवार यांनी लाभ न उठवला असता तरच नवल. चांदवड येथील रास्तारोको आंदोलनात स्वत: सहभागी होऊन पवार यांनी शेतकरी हा आपल्या राजकारणाचा खुंटा अधिक बळकट केलाच, शिवाय त्यांना सोडून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांचीही धाकधूक वाढवली.

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवले असले तरी, त्याचा महाराष्ट्रातील निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. महाराष्ट्रातील राजकारणाचा शरद पवार यांच्याइतका प्रदीर्घ अनुभव असलेला दुसरा नेता सध्यातरी नाही. प्रामुख्याने ग्रामीण भागातील राजकारणावर पवार यांची पकड असल्याने शेतकरी हा त्यांच्या राजकारणाचा गाभा राहिला आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून कृषिविषयक निर्णय घेतांना धरसोड वृत्तीचे दर्शन वारंवार घडत असल्याने ते पवार यांच्या पथ्यावरच पडत आहे. शहरी मतदारांना ध्यानात ठेवत केंद्र सरकार कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी घेत असलेले ४० टक्के निर्यातशुल्क, निर्यातबंदी यासारख्या निर्णयांमुळे कांदा उत्पादकांमध्ये निर्माण झालेला असंतोष वेळोवेळी उफाळून आला आहे.

हेही वाचा… जयंत पाटील यांच्या विरोधात अजितदादांची राजू शेट्टी यांना ताकद ?

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात निर्माण होत असलेला रोष लक्षात घेऊन पवार यांनी थेट मैदानात उतरून रास्तारोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडची निवड केली. चांदवड-देवळा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे डाॅ. राहुल आहेर तर, हा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो, त्या दिंडोरीच्या भाजप खासदार डाॅ. भारती पवार केंद्रात आरोग्य राज्यमंत्री आहेत. निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, येवला या सर्व भागात कांदा उत्पादकांची संख्या अधिक. त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणे साहजिक होते. झालेही तसेच. त्यातच काँग्रेस, ठाकरे गट, शेतकरी संघटना यांचेही बळ मिळाले. एकाच आंदोलनातून पवार यांनी भाजपविरोधात शेतकऱ्यांसह सर्व विरोधकांची एकजूट घडवून आणण्याची किमया साध्य केली. केंद्रात कृषिमंत्रीपद भूषवितांना कांदा उत्पादकांना न्याया देण्यासाठी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन देण्यासही ते विसरले नाहीत. नाशिकपासून चांदवडपर्यंत येताना ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी पुढे येणारे शेतकरी, मित्रपक्षांचे पदाधिकारी, हे चित्र पवार यांना बदलत्या राजकारणात नक्कीच सुखावणारे आणि राजकाराची पुढील दिशा ठरविण्यासाठीही महत्वाचे ठरेल. पवार यांच्या आंदोलनामुळे आणि त्यास मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपचे आमदार, खासदार आणि अजित पवार गटाचे आमदार यांची चलबिचल वाढणे साहजिक आहे. त्यामुळे पुढील राजकारणात अजित पवार गटात काही धक्कादायक घडामोडी घडल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती असल्याचे पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

हेही वाचा… पुणे जिल्ह्यात विकास कामांवरून आजी – माजी आमदारांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांविषयी शरद पवार हे कायमच सतर्क असतात. शेतकऱ्यांविषयी त्यांना आस्था आहे. त्यामुळे अवकाळी असो, गारपिटीमुळे पिकांचे झालेले नुकसान असो, कांदा निर्यातबंदी असो, या सर्वांची दखल त्यांच्याकडून घेण्यात आली. शेतकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरल्याने मित्रपक्षांसह विरोधकांनीही त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील राजकारणात पवार यांना नक्कीच हे फायदेशीर ठरेल – गजानन शेलार (ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी शरद पवार गट)

देशातील इंडिया आघाडीचे शरद पवार हे नेते आहेत. केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, इथेनाॅल निर्मिती बंदी असे कृषिविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याविरोधात पवार हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून रस्त्यावर उतरले. त्यामुळे त्यांना सर्वांची साथ मिळाली. निर्यातबंदी त्वरीत रद्द करण्याची गरज आहे. – अनिल कदम (माजी आमदार)