Louise Khurshid Money Laundering काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मोठी कारवाई केली. लुईस खुर्शीद आणि अन्य दोघांनी एका ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या निधीतील ७१.५० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला. लुईस यांच्यासह इतर आरोपींची ४५.९२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

कोण आहेत लुईस खुर्शीद?

ईडीच्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील कैमगंज येथील ६९ वर्षीय माजी काँग्रेस आमदार लुईस यांचे नाव चर्चेत आले आहे. काँग्रेसच्या वर्तुळात, लुईस यांना प्रामुख्याने पती सलमान खुर्शीद यांना पक्षाच्या कामात सहाय्य करण्यासाठी किंवा त्यांच्या सार्वजनिक संपर्कात मदत करण्यासाठी ओळखले जाते. फारुखाबाद आणि आजूबाजूच्या परिसरात त्या समाजसेवेचेदेखील कार्य करतात. फारुखाबाद येथे त्यांना रोखठोक भूमिका घेणार्‍या, स्पष्टवक्त्या नेत्या म्हणूनही ओळखले जाते. कैमगंज येथील त्यांच्या सभेचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लुईस या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या व्हिडीओत त्या काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांना टोला लगावताना दिसल्या होत्या.

Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Dp Campaign by aap
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता ‘डीपी मोहिम’; आप नेत्या म्हणाल्या, “आज दुपारपासून…”
Delhi Excise Policy Scam K Kavitha
के. कविता यांच्या अडचणीत वाढ, ‘आप’ नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा ईडीचा दावा

नेमके प्रकरण काय?

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) च्या तरतुदींनुसार फारुखाबाद येथील १५ शेतजमीन आणि डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टच्या एकत्रित ४५.९२ लाख रुपये किमतीच्या बँक ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशीत असे आढळून आले आहे की, केंद्र सरकारकडून ट्रस्टला मिळालेले ७१.५० लाख रुपयांचे अनुदान शिबिरांसाठी वापरले गेले नाही. ट्रस्टच्या हितासाठी असलेले अनुदान ट्रस्टचे प्रतिनिधी दिवंगत प्रत्युष शुक्ला, ट्रस्टचे सचिव मोहम्मद अथर ऊर्फ अथर फारुकी आणि प्रकल्प संचालक लुईस खुर्शीद यांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा आरोप ईडीने केला. २००९-१० मध्ये अनुदान म्हणून मिळालेला निधी त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद केली. अखेर २०१७ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले. २०१२ मध्ये एका माध्यम समूहाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननुसार, खुर्शीद यांचे आजोबा आणि भारताचे तिसरे राष्ट्रपती यांच्या नावावर असणारी ‘डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्ट’ लुईस चालवतात. या ट्रस्टला अपंग लोकांना कृत्रिम अवयव आणि व्हीलचेअरच्या दान करण्यासाठी मिळालेल्या सरकारी अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप एका माध्यम समूहाने केला होता. माध्यम समूहाचा आरोप होता की, ट्रस्टने या अनुदानाचा वापर करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट शिक्का वापरत, सरकारी अनुदानाचा गैरवापर केला. गेल्या महिन्याच्या ७ फेब्रुवारीला बरेली येथे खासदार-आमदार न्यायालयाने लुईस यांच्यासह अन्य दोन आरोपींविरुद्ध अटकेचा आदेश दिला होता.

लुईस यांचा राजकीय प्रवास

लुईस यांनी २००२ मध्ये कैमगंज मतदारसंघातून आपली पहिली विधानसभा निवडणूक जिंकली होती. परंतु, २००७ मधील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी २०१२ आणि २०२२ च्या निवडणुकीत फारुखाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकांमध्ये दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. २००७ च्या निवडणुकीत लुईस कैमगंजमधून बसपच्या कुलदीप सिंग गंगवार यांच्याकडून सुमारे ६,५०० मतांनी पराभूत झाल्या. २०१२ च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मागासलेल्या मुस्लिमांसाठी नऊ टक्के उप-कोटा देण्याची घोषणा केली. ज्याची तक्रार भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली होती; ज्यानंतर लुईस यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

हेही वाचा : Bengaluru Bomb Blast: आयईडी स्फोटक म्हणजे काय? भारतात पूर्वी या स्फोटकाचा वापर झाला का?

२०१२ मध्ये ही जागा अपक्ष नेत्याने जिंकली. या निवडणुकीत लुईस यांना २२,९२३ मते मिळवून पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २०१७ मध्ये लुईस यांनी निवडणूक लढवली नाही. २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा फारुखाबादमधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत लुईस यांना केवळ २०२९ मते मिळाली.