काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील १०० दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रेचं नेतृत्व करत आहेत. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी ही यात्रा आहे. सध्या ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा नेमका हेतू काय आहे? याबाबत खुलासा केला आहे. “आपण द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उभारत आहोत” असं राहुल गांधींनी सांगितलं. ते राजस्थानमधील अलवर येथे ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, “मागील १०० दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. अनेकदा मी भाजपाच्या कार्यालयापासून गेलो. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हाताची घडी घालून उभं राहतात. त्यांनाही माझ्याकडे पाहून हातवारे करायचे असतात, पण ते तसं करू शकत नाहीत. अशावेळी मी त्यांना ‘फ्लाइंग किस’ देतो. मी त्यांचा अजिबात द्वेष करत नाही. माझी लढाई त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे, पण हे लोक मला आवडतात,” असंही राहुल गांधी म्हणाले.

HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
Ajit Pawar, Rahul Gandhi,
अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

हेही वाचा- अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा! राजस्थानमध्ये गरिबांना ५०० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर

“त्यांचे नेते कधी कधी विचारतात, राहुल गांधी असं भारत जोडो यात्रेत का फिरत आहेत? यावर मी विचार करत होतो की, ‘खरंच मी का फिरतोय?’ मी लोकांमध्ये फिरतोय, लोकांना भेटतोय आणि लोकांना मिठी मारतोय, पण हे सगळं मी का करतोय? याचं उत्तर मला सापडलं. “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं” (द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उभारत आहे),” असं गांधी म्हणाले.

हेही वाचा- ‘दारू पियोगे तो मरोगे’, नितीशकुमारांच्या विधानानंतर सुशीलकुमार मोदींची जोरदार टीका; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचा…”

भाजपाला उद्देशून राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही माझा तिरस्कार करता, मला शिव्या देता. ही तुमच्या मनातील भावना आहे. तुमचा द्वेषाचा बाजार आणि माझं प्रेमाचं दुकान आहे. यापूर्वी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेसनेही भारताला स्वातंत्र्य मिळवून देणासाठी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान थाटलं होतं. आम्हीही तेच करत आहोत.”