जननायक जनता पार्टीची हरियाणात सत्ताधारी पक्षासोबत युती असून ते स्वत: राज्यातील कॅबिनेटचा भाग आहेत. तरीही जननायक जनता पार्टीचे प्रमुख देवेंद्र सिंह बाबली सुरुवातीपासून मनोहर लाल खट्टर प्रणीत सरकारचे कट्टर टीकाकार मानले जातात. आता तर त्यांनी राज्याच्या प्रशासकीय कारभारावर निशाणा साधत ड्रग माफिया तसेच भ्रष्टाचाऱ्यांना रान मोकळे मिळाल्याचा आरोप केला आहे. आपले वर्चस्व असलेला मुलूख स्वत:च्या ताब्यातच राहावा यासाठी त्यांचा राग अनावर झाल्याची कुजबूज आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबली हे ५२ वर्षीय व्यावसायिक असून काही वर्षांपूर्वीच त्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द सुरू केली. ते सुरुवातीच्या काळात कॉँग्रेसच्या बाजूने होते. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख अशोक तनवर यांच्या मर्जीतले होते. मात्र तनवर यांनी कॉँग्रेस सोडली आणि याच धामधुमीत बाबली देखील दुरावले. सध्या बाबली हे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांत गणले जातात.  केवळ टोहानाच नव्हे तर संपूर्ण राज्याने “भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे”  असे म्हणत भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार बाबली यांनी केले. संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, “मी या प्रकारासाठी सरकारच्या कणाहीन भूमिकेला जबाबदार धरतो.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra singh bali a opponent of the khattar government got aggressive against own government pkd
First published on: 22-08-2022 at 14:08 IST