लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाही. समाजवादी पक्ष-काँग्रेस आणि एनडीतील घटक पक्षांनंतर आता समजावादी पक्ष आणि अपना दल (कामेरवाडी) यांच्यातही जागावाटपावरून मतभेद असल्याचे पुढे आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२२ पासून या दोन्ही पक्षांची युती आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

मंगळवारी अपना दलने (कामेरवाडी) पूर्व उत्तर प्रदेशातील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर समाजावादी पक्षातील नेत्यांनी अपना दलवर एकतर्फी उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला आहे. त्याचे प्रत्युत्तर म्हणून समाजवादी पक्षानेही बुधवारी संध्याकाळी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे; ज्यात मिर्जापूरच्या जागेचाही समावेश आहे. या जागेवर अपना दलनेही दावा केला होता.

What Supriya Sule Said About Sharad Pawar?
“शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं हा अदृश्य शक्तीचा..”, सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

हेही वाचा – ‘माझ्याकडे रेफ्युजी सर्टिफिकेट आहे ते सरकारला चालत नाही, आता मी भारतीय आहे कसं सिद्ध करू?’; निर्वासित नागरिकाचा सरकारला सवाल

महत्त्वाचे म्हणजे उमेदवार जाहीर करण्याच्या एक दिवस पूर्वी म्हणजेच सोमवारी अपना दलने आगामी निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातील फुलपूर, मिर्झापूर व कौशांबी या जागांचा समावेश होता.

बुधवारी संध्याकाळी समाजवादी पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार, समाजवादी पक्षाने मिर्झापूरमधून राजेंद्र एस. बिंद यांना उमेदवारी दिली आहे. तसेच संभलमधून झिया उर रहमान बारक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय बागपतमधून मनोज चौधरी, गौतम बुद्ध नगरमधून राहुल अवाना, पिलिभीतमधून बागवत सरन गंगवार व घोसीमधून राजीव राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खरे तर समाजवादी पक्ष आणि अपना दल (के) यांच्यात मागील काही दिवसांपासून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतही हे मतभेद सार्वजनिकरीत्या दिसून आले होते. यावेळी अपना दलच्या नेत्या आमदार पल्लवी पटेल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. समाजवादी पक्षाने पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) सूत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

जागावाटपाबरोबर बोलताना, अपना दलच्या नेत्या अध्यक्ष कृष्णा पटेल म्हणाल्या, “आम्ही इंडिया आघाडीचा भाग आहोत. तसेच २०२२ पासून आमची समाजवादी पक्षाबरोबर युती आहे. त्यानुसार आम्ही फुलपूर, मिर्झापूर व कौशांबी या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी या तीन जागांसाठी आमची अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र, गेल्या एका महिन्यात याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तसे होऊ शकले नाही.”

हेही वाचा – माजी राजदूतांच्या भाजपा प्रवेशाने आप-काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? कोण आहेत तरनजीत सिंग संधू?

कृष्णा पटेल यांच्या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणाले, “अपना दलने केवळ या तीन जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी आम्हाला उमेदवारांची नावे सांगितली नव्हती. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय एकर्फी आहे. हा एक प्रकारे समाजवादी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.”

अपना दल (कामेरवाडी) हा दिवंगत ओबीसी नेते डॉ. सोनेलाल पटेल यांचा अपना दल पक्षात एक गट आहे. २००९ मध्ये डॉ. सोनेलाल पटेल यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर पक्षात फूट पडल्याने अपना दल (कामेरवाडी) आणि अपना दल (सोनेलाल) असे दोन गट पडले आहेत. त्यापैकी अपना दल (सोनेलाल) हा गट एनडीएबरोबर आहे.

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत फुलपूर, मिर्झापूर व कौशांबी या तिन्ही जागा एनडीएने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कौशांबीमधून विनोद सोनकर यांनी ३८ हजार ७२२ मतांनी, फुलपूरमधून केशरी देवी पटेल यांनी एक लाख ७७ हजार मतांनी, तर मिर्झापूरमधून अनुप्रिया पटेल यांनी दोन लाख ३२ हजार मतांनी विजय मिळविला होता.