नाशिक : विधान भवनात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेद्र थोरवे यांच्यातील बाचाबाचीने शिवसेनेतील सुप्त अस्वस्थता एकप्रकारे उघड झाली. शिवसेना दुभंगल्यापासून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी एकजूट असल्याचे दर्शविण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. या घटनेने त्यास धक्का दिला. विधान भवनातील घटनेनंतर असा काही वादच झाला नसून शिवसेना एकसंघ असल्याचा दावा मंत्री भुसे यांनी केला. दुसरीकडे आमदार थोरवे यांनी मात्र भुसेंच्या कार्यशैलीवर बोट ठेवत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि इतर नाराज आमदारांचे दाखले दिले. एकंदर शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

विधान भवनातील बाचाबाचीमुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (रस्ते विकास मंडळ) तथा नाशिकचे पालकमंत्री भुसे आणि आमदार थोरवे यांच्यातील वादाने शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली. खरेतर भुसे हे आक्रमकतेसाठी ओळखले जात नाहीत. पण त्यांच्या कार्यपध्दतीवर स्वकीय आमदाराने नोंदविलेले आक्षेप शिवसेनेसाठी (शिंदे गट) अडचणीचे ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगूनही भुसे यांनी आपल्या मतदार संघातील कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा थोरवेंचा आक्षेप आहे. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यावर ते चिडून बोलले. त्यातून बाचाबाची झाल्याची कबुली थोरवेंंनी दिली. खात्याचा दुरुपयोग करून भुसे हे आमदारांकडे दुर्लक्ष करतात, चुकीची वागणूक देतात. त्यांच्याबाबत सुहास कांदे व अन्य आमदार अनुभव सांगू शकतील, याकडे थोरवे यांनी लक्ष वेधले होते.

Kashmiri voters form m (1)
काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
bjp manifesto sankalp patra
भाजपची विकास, विरासत, ‘विस्तारा’ची संकल्पपत्रात ‘गॅरंटी’

हेही वाचा…. भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

सुहास कांदे हे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतला जाणारे ते राज्यातील पहिले आमदार होते. भुसे हे अगदी अखेरच्या टप्प्यात .गुवाहाटीला गेले. आमदार कांदे यांचेही भुसेंशी फारसे जमत नाही. एकदा मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले असता कांदे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. पक्षीय बैठकांपासून दूर ठेवले गेले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय बैठकीला बोलवले जात नव्हते. पूर्वी, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ किंवा गिरीश महाजन यांच्या कार्यालयाकडून बैठकींची माहिती दिली जात असे. पण, मंत्री भुसे यांच्याकडून बैठकांबाबत माहिती दिली जात नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला होता. दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून नांदगावला वगळल्यावरून त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भुसेंवर नाराजी व्यक्त केली होती. नांदगाव या अवर्षणप्रवण तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. त्याच तालुक्याला वगळल्याने कांदेंनी आक्रमक भूमिका घेताच नांदगावचा दुष्काळी तालुक्यात समाविष्ट झाला. भुसे आणि कांदे यांचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहे. पालकमंत्री भुसे यांनी नांदगाव तालुक्यातील ४८ गावांचा विकास निधी परस्पर मालेगावकडे वळवल्यावरून त्यांची नाराजी आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे भुसे आणि कांदे हे दोनच आमदार आहेत. कांदे यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु, अखेरच्या टप्प्यात आलेल्या भुसेंमुळे त्यांची संधी हुकली. उभयतांतील वाद वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्तीने मिटले. स्थानिक पातळीपर्यंत ते सिमित राहिले होते. विधान भवनातील मंत्री-आमदार वादाने शिंदे गटाची पंचाईत झाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये कामे होत नाहीत, निधी मिळत नाही, अशा तक्रारी करीत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी राज्यात महायुतीची सत्ता समीकरणे जुळवली. नव्या सरकारमध्ये आमदारांनी पुन्हा तोच सूर लावल्यास विरोधकांना आयते कोलीत मिळेल, याची पक्षाला चिंता आहे. त्यामुळे भुसे यांच्यासह अन्य नेत्यांनाही सारवासारव करावी लागली.

हेही वाचा… आघाडीत बुलढाणा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

विधान भवनात सहकारी आमदार महेंद्र थोरवे आणि माझ्यात काही वाद झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. थोरवे हे माझे मित्र आहेत. आमच्या पक्षाचे सहकारी आमदार आहेत. विरोधी पक्षाला सीसीटीव्ही चित्रण पहायचे असेल तर ते पाहू शकतात. विरोधकांच्या हाती काही बोलायला नसल्याने नको त्या वावड्या उठविण्यात आल्या आहेत. शिवसेना एकसंघ आहे. – दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक)