शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या उरण विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार महेश बालदी यांच्या रुपाने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले असले तरी राज्यातील बदललेल्या राजकीय गणितांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लागूनच असलेला हा मतदारसंघ उरण, पनवेलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव पाडू शकेल अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

रायगड जिल्ह्यात मोठी ताकद असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने अजूनही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय उघडपणे जाहीर केलेला नाही. उरण विधानसभा मतदारसंघाच्या तिहेरी लढतीत शेकापला मिळणारी मते ही नेहमीच नजरेत भरणारी ठरत आली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना आणि शेकापची युती झाल्यास भाजपचे बालदी यांना ही निवडणुक वाटते तितकी सोपी नाही हे स्पष्टच आहे. याठिकाणी शेकाप-शिवसेनेत मनोमिलन झाल्यास रायगड जिल्ह्यातील राजकारणात नवी समिकरणे पहायला मिळतील हे मात्र स्पष्टच आहे.

There is no trace of campaigning in the drought stricken region of Marathwada
निवडणुकीपेक्षाही पाणीटंचाईशी दोन हात महत्त्वाचे; मराठवाड्यातील दुष्काळी प्रदेशात प्रचाराचा मागमूसही नाही
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
kolhapur lok sabha seat, sangli lok sabha seat, Shaktipeeth mahamarg, farmers opposing, main election campgain topic, maha vikas aghadi,congress, bjp, shivsena, ncp, land acquisition mahayuti,
शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचा निवडणुकीत राजकीय वापर
Ramtek Lok Sabha, Ramtek, mahayuti Ramtek,
मतदारसंघाचा आढावा : रामटेक; नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?

हेही वाचा – इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द; सनातन धर्मावर टीका केल्यामुळे लोकांमध्ये रोष, भाजपाचा दावा

रायगड मधील उरण विधानसभा मतदारसंघ हा २००९ च्या पुनर्रचनेत निर्माण झाला. २०१४ पासून या मतदारसंघात भाजपने आपला ठसा उमटविला आहे. उरणच्या नगरपरिषदेत भाजपची ताकद पूर्वीपासून राहिली आहे. शहरीपेक्षा ग्रामीण तोंडवळा लाभलेल्या या मतदारसंघात शेकाप आणि शिवसेनेची मोठी ताकद असूनही महेश बालदी यांनी गेल्या काही वर्षांत भाजपची पाळेमुळे इथे खोलवर जातील यासाठी काम केल्याचे पहायला मिळते. देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले जवाहरलाल नेहरू बंदर हे याच मतदारसंघात मोडते. बालदी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीयांमध्ये ओळखले जातात. शिवाय लगतच असलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठी ताकद राखून असलेले रामशेठ ठाकूर आणि त्यांचे पुत्र प्रशांत हेदेखील भाजपवासी झाल्याने उरणमध्येही या स्थित्यंतराचा फायदा भाजपला आणि बालदी यांना झालेला दिसतो. शिवसेनेची मोठी ताकद असूनही २०१९ मध्ये येथे पक्षाचे विद्यमान आमदा मनोहर भोईर यांचा बालदी यांनी पराभव केला.

बालदी यांना भाजपची आणि पनवेलच्या ठाकूर कुटुंबियांची साथ लाभली. या लढतीत शेकापने मिळवलेली ६० हजारांपेक्षा अधिक मते मात्र अजूनही चर्चेत आहेत. माजी आमदार मनोहर भोईर सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. या मतदारसंघातून ते इच्छुकही आहेत. शेकापची साथ त्यांना लाभली तर उरणचे राजकारण रंगतदार अवस्थेत पोहोचेल हे स्पष्टच आहे. शिवाय उरणमधील ही युती रायगडच्या राजकारणालाही कलाटणी देणारी ठरेल असे महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत आहे.

मतांचे गणित कसे ?

२०१९ च्या निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजप युती असतानाही उरण मतदारसंघात ही युती टिकली नाही. भाजपचे महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ती ५ हजार ७०० मतांनी जिंकली. शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांचा त्यांनी पराभव केला. येथे शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार विवेक पाटील यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत अपक्ष महेश बालदी यांना ७४ हजार ५४९, मनोहर भोईर यांना ६८ हजार ८३९ तर विवेक पाटील – ६१ हजार ६०६ मते मिळाली होती.

हेही वाचा – मराठवाडा पॅकेजचा महायुतीला फायदा किती?

उरण विधानसभा मतदारसंघात शेकापची पडझड झाली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी तुरुंगातूनच सक्रिय राजकारणातील निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपची वाट धरली आहे. असे असले तर शेकापला मानणारा मतदार कोणाच्या बाजूने जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारसंघ शेकापचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तो महाविकास आघाडीत शिवसेनेसाठी सोडावा या मनस्थितीत येथील कार्यकर्ते नाहीत. या मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे स्थानिक नेते वारंवार जाहीर करीत आहेत. आमदार बालदी यांच्यामुळे भाजपची ताकद वाढत असताना शेकापशिवाय त्यांना आव्हान देणे हे सोपे नाही याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे येथील राजकारणाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वाटचालीवर होईल हे स्पष्टच आहे.