निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार? | Election Commission wants political parties to disclose cost of scheme annouced by them during election rmm 97 | Loksatta

निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार?

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या लोकप्रिय घोषणा आणि आश्वासनं दिली जातात.

निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार?

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या लोकप्रिय घोषणा आणि आश्वासनं दिली जातात. पण निवडणूक जिंकल्यानंतर बहुतांशी वेळा अशा घोषणांची पूर्तता राजकीय पक्षांना करता येत नाही. त्यामुळे निवडणूक काळात केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही सादर करण्याबाबत नवीन नियम आणण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून केली जात आहे. यासाठी लवकरच एक सल्लापत्र जारी करण्याची योजना निवडणूक आयोगाची आहे.

खरं तर, मोफत गोष्टी देणं आणि लोक कल्याणाची योजना आणणं याची व्याख्या करणं अवघड आहे. राजकीय पक्षांकडून मोफत गोष्टी देण्याबाबत केलेल्या घोषणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक गणितं काय असतील? यामागचे तर्क स्पष्ट करावेत, अशी इच्छा निवडणूक आयोगाची आहे.

हेही वाचा- झाकोळलेल्या ‘भारत जोडो’ला राहुल गांधी यांच्या पावसातील सभेने उभारी

राजकीय पक्षांना आश्वासने देण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, परंतु संबंधित आश्वासने अंमलात कशी आणली जाणार आहेत? हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांनाही आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विस्तृत मते मागवली आहेत. या निर्णयामुळे मतदारांना राजकीय पक्षांची तुलना करणे आणि आश्वासनांची पूर्तता करता येईल की नाही? हे समजून घेण्यास मदत होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद ?

संबंधित बातम्या

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भूमिका घेण्यावरून विरोधी पक्षांत दुमत, जेडी(एस) ने मुर्मु यांना समर्थन देण्याची भूमिका 
धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग
माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे तळ्यात-मळ्यात
डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण
काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा