एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या प्रतिनिधीत्व करीत असलेल्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या बंधूने आगामी निवडणूक लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे.

nanded lok sabha marathi news, nanded lok sabha latest marathi news
मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!
mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

गेल्या जून महिन्यात पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोनवेळा येऊन गेल्यानंतर त्यांच्या शिवसेनेत उभारी आली असून त्यातूनच आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्यची जागा लढविण्याचे या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वेध लागले आहेत. विशेषतः सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येते. याच मतदारसंघावर डोळा ठेवून आयोजिलेली आरोग्य महाशिबिरे, त्यात प्रा. सावंत बंधुंचे होणारे प्रतिमासंवर्धन, काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाखालील भागाशी वाढता संपर्क या माध्यमातून शिवसेना बरीच सक्रिय झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा… भाजप-राष्ट्रवादीत खांदेपालट, शिवसेनेतही नवे चेहरे; काँग्रेसला मुहूर्त मिळेना

२००९ पासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या तथा पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघातून सलग तीनवेळा प्रतिनिधित्व करीत आहेत. मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाने चांगली झुंज देऊन आमदार प्रणिती शिंदे यांची दमछाक केली होती. शिवसेनेचे महेश विष्णुपंत कोठे (२०१४) आणि दिलीप ब्रह्मदेव माने (२०१९) यांची दारूण निराशा झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी शिवसेनेकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी अयशस्वी लढत दिलेले महेश कोठे हे सध्या शरद पवारप्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर दिलीप माने हेसुध्दा सोयीचा राजकीय पक्ष शोधत आहेत. कोठे आणि माने हे दोघेही सोलापूर शहर मध्यची जागा लढविण्याच्या मानसिकतेत नाहीत.

हेही वाचा… श्वेतपत्रिका राजकीय हिशेब चुकते करण्याचे हत्यार

राज्यातील शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. जिल्ह्यात भाजप-सेना युतीमध्ये सोलापूर शहर मध्यप्रमाणेच माढा, बार्शी, करमाळा, मोहोळ या जागा शिवसेनेकडे आहेत. यापूर्वी माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रा. शिवाजी सावंत यांनी भवितव्य अजमावले होते. परंतु त्यांना निराशाच पत्करावी लागली आहे. सावंत बंधू माढा तालुक्यातूनच राजकारणात आले आहेत.

हेही वाचा… ‘भाई’ तुम्ही कोठे आहात?

सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता मुख्यमंत्री शिंदे गटाने मनावर घेऊन सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेवर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. त्यादृष्टीने पक्षात राहून मोठे झालेले सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी या मतदारसंघतून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तशी वाच्यता मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत प्रथमच करण्यात आली होती. या मतदारसंघात पूर्वस्थितीनुसार शिवसेनेची सुमारे ३० हजार मते गृहीत धरली जातात. त्यात आणखी सुमारे २० हजार मतांची नव्याने भर घालण्यासाठी ताकद कशाप्रकारे उभी करावी लागेल, यादृष्टीने व्यूहरचना केली जात आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जात असल्याचे बोलले जाते. याच मतदारसंघात यापूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत राहिलेल्या प्रसिध्द सूत्रसंचालिका प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्यांची पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

हेही वाचा… विनोदाने का होईना पण गडकरी खरे बोलले !

प्रा. ज्योती वाघमारे अनुसूचित जातींपैकी असलेल्या जांबमुनी मोची समाजाच्या आहेत. हा समाज अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. मतदारसंघात लक्षणीय संख्येने असलेल्या या समाजाला काँग्रेसपासून तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मतदारसंघात विविध ठिकाणे विशेषतः झोपडपट्ट्यांचा परिसर जाणीवपूर्वक निश्चित करून तेथे शिवसेनेकडून महाआरोग्य शिबिरे भरविली जात आहेत. यात आतापर्यंत सुमारे २५ हजार रूग्णांची आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या माध्यमातून या लाभार्थी वर्गाला शिवसेनेने आपलेसे करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे.