सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीसाठी मुंबईत मोर्चा निघाला तेव्हा घरी मुलगा तापाने फणफणलेला. नेत्याच्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याचे मुंबईतील मोर्चेकऱ्यांना कळाले, पण ही बाब नेतृत्त़्व करणाऱ्या उद्धवराव पाटील यांच्यापर्यंत कोण सांगणार? ते शांतपणे मोर्चात सर्वात पुढे चालत होते. त्यांना मुलाच्या प्रकृतीची माहिती दिली गेली. पण मोर्चातील भाषणातील आवेश आणि मांडणीतील मुद्देसुदपणा हरवला नाही.

What Mallikarjun Kharge Said?
मल्लिकार्जुन खरगेंची भावनिक साद, “मतं द्या किंवा देऊ नका पण माझ्या अंत्यसंस्काराला जरुर या!”
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

पांढरा नेहरु शर्ट आणि धोतर असा पेहरावा. भाषणात येणारे ‘होय रं गड्या’, ‘का रं गडया’ असे रांगडे शब्द. घरीच राजकारणाची बैठक. येणारा माणूस पान मागायचा. कोणी तंबाखूला हात पुढे करायचा पण चर्चा व्हायच्या त्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या. कष्टकरी कामगारांचा तो बुलंद आवाज मराठवाड्यातून संपला आहे. क्षीण झालेल्या शेतकरी कामगार पक्षातील मंडळीच आता , ‘ भाई, तुम्ही कुठे आहात ? ’ असा प्रश्न विचारत आहेत. शेकापच्या वर्धापन दिनी एकेकाळच्या शेकापच्या बालेकिल्ल्यात गुरुवारी कसेबसे पक्षध्वज उंचावला गेला तेव्हा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी शिल्लक होती.

हेही वाचा… शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन

मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यात काँग्रेसला पाय रोवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, त्याचे कारण भाई उद्धवराव पाटील. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा उस्मानाबाद मतदारसंघ हा हैदराबाद विधानसभेचा भाग होता. या काळात जमीनधारक शेतकरी घरीच बसून शेती पाहायचा. राबणारा मजूर वेगळाच होता. कष्ट करणाऱ्याची जमीन अशी बाजू मांडणाऱ्या उद्धवराव पाटील यांच्या मांडणीमुळे हैदराबाद कुळ कायदा तेव्हा हैदराबाद विधिमंडळात मंजूर झाला. १९५६ साली हैदराबाद राज्याची पुनर्रचना करताना मराठवाड्यातील पाच मराठी भाषक जिल्हे जोडले गेले. तेव्हा तामीळ बोलणाऱ्यांचा एक प्रदेश असावा म्हणून केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली होती. त्याच न्यायाने संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. कम्युिनस्ट नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. अहिल्या रांगणेकर आदींसह शेकापचे उद्धवराव पाटील, भाई दाजीबा देसाई, भाई. एन. डी. पाटील, नरसिंग देशमुख, अण्णासाहेब गव्हाणे, भाई केशवराव धोंडगे ही मंडळी तेव्हा नेतृत्व करत होती. १९५७ साली मुंबई राज्याच्या विधिमंडळाच्या निवडणुकीतही ते निवडून आले. पुढे १९६७, १९७२ मध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. त्याचे कारण आंदोलनात धग निर्माण करण्याची शक्ती आणि भाषणातील आवेश हेही होते.

हेही वाचा… विनोदाने का होईना पण गडकरी खरे बोलले !

अलिकडे विरोधी पक्ष नेतेपद सत्ताधाऱ्यांच्या ओटीत केव्हा जातील असे तेव्हा वातावरण नव्हते. विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे विधिमंडळात नवनवीन कायदे तयार होत. १९६७ साली लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी झालेल्या. तेव्हा लातूर विधानसभेची जागा अनुसूचित जाती आणि उस्मानाबाद लोकसभेची जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी होती. पण उस्मानाबादच्या लोकसभेच्या जागेवर हरिहरराव सोनुले या अनुसूचित जातीतील व्यक्तीस शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी दिली होती. दलित समाजास प्रतिष्ठा दिली जाते असा संदेश गेला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमदेवार विजयी झाले. राजकारण हे तत्त्वासाठी करायचे असते हे जाणून त्या दृष्टीने पाऊले उचणारे नेते शेकापचे नेते आता मराठवाड्यात शिल्लक उरलेले नाहीत.

हेही वाचा… हेही वाचा… जळगाव पालिकेतील घडामोडींमध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप

‘बिन चिपळ्याचा नारद’ अशी उपमा देऊन शरद पवारांचा मुका घेणारे केशव धोंडगे आणि भाई उद्धव पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न मांडताना पक्षनिष्ठा कशा असाव्यात याचे उदाहरण घालून दिले होते. आता त्याच मराठवाड्यात शेकापचा झेंडा काही मोजक्याच गावात लागतो खरा, पण तेव्हा समर्थकांची संख्या कमालीची रोडवली आहे. राजकीय पटलावर न दिसणाऱ्या या पक्षातील इतिहास सांगणारी माणसेही आता खूपच कमी आहेत. ‘भाई’ शब्द आपल्या नावाच्या आधी लागावा यासाठी राज्यातील अनेक कार्यकर्ते एकेकाळी जीवाचे रान करायचे. आता राजकारणात खूप भाई आहेत. पण प्रश्न पडतो ‘भाई, तुम्ही कुठे आहात ?’