उत्तर प्रदेशातील सत्ताकारण सध्या चर्चेत आहे ते यादव कुटुंबातील सत्तासंघर्षामुळे. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने यादवांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते.  यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी खास पौराणिक कथांच्या माध्यमातू पुतण्या अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सणाच्या निमित्ताने त्या दिवशी यदुवंशी आणि यादव वीर यांना उद्देशून एक संदेश जाहीर केलं केला. यात त्यांनी म्हटले आहे की “कंसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्तींविरूद्ध एकजूट होण्याची गरज आहे. त्यांनी विश्वासघाताने आपल्या वडिलांना काढुन राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) संस्थापक आणि नेते शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. जेव्हा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी मुलगा अखिलेश यांना समाजवादी पक्षाचा वारसदार म्हणून निवडण्याच निर्णय घेतला तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्यातील संबंध ताणले गेले. शिवपाल यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका सपाच्या चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्याही. मात्र ते पुन्हा सपामध्ये परतले नाहीत.

अलीकडेच, शिवपाल यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत त्यांना मतदान केले होते. यावर ते आपली भूमिका घेण्यास स्वतंत्र आहेत अशी प्रतिक्रिया अखिलेश यांनी दिली आहे. शिवपाल यांनी शुक्रवारी आपल्या संदेशात म्हटले आहे की  ” जगात जेव्हा कंस आपल्या वडिलांना विश्वासघाताने काढून राज्य स्थापन करतो तेव्हा धर्म वाचवण्यासाठी यशोदेचा पुत्र आणि गवळ्यांचा मित्र कृष्णाचा जन्म होतो. अशा अत्याचारांमागे असलेल्यांना तो धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शिक्षा करतो” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादव लोक कृष्णाला आपलाच मानतात. त्याच समाजाती लोकांना थेट आवाहन करत शिवपाल म्हणाले “ माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी धर्माचा झेंडा घेऊन निघालो आहे. मी तुम्हा यादव वीरांना आवाहन करतो की, माझ्यासोबत येण्यास उशीर करू नका”. शिवपाल यांनी यादवांना दिलेली भावनिक हाक ही शिवापाल यांनी मुलायम यांच्यासोबत सपाची स्थापना केली होती तेव्हाची आठवण करून देते. आपल्या पक्षाची निर्मिती ही ईश्वराची इच्छा असल्याचेही शिवपाल त्यावेळी म्हणाले होते.