कर्नाटक भाजपामधील नाराजी चव्हाट्यावर! मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने माजी मंत्र्याने केले नेतृत्वाला लक्ष्य | K S Eshwarappa upset not inducted in bjp karnataka cabinet skip assembly session | Loksatta

कर्नाटक : भाजपामधील नाराजी चव्हाट्यावर! मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने माजी मंत्र्याने केले नेतृत्वाला लक्ष्य

कर्नाटक भाजपामधील असंतोष माजी मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या रुपात समोर आला आहे.

कर्नाटक : भाजपामधील नाराजी चव्हाट्यावर! मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने माजी मंत्र्याने केले नेतृत्वाला लक्ष्य
के एस ईश्वरप्पा (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

कर्नाटक भाजपामधील असंतोष माजी मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या रुपात समोर आला आहे. मंत्रिमंडळात अद्याप स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला लक्ष्य करत अधिवेशनास अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला आहे. ईश्वरप्पा शिवमोग्गा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांनी ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. याच कारणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा >>> पश्चिम बंगाल : नंदीग्राम मतदारसंघात तृणमूलला धक्का, सहकारी कृषी समितीच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय

माझा मंत्रिमंडळात अद्यापही समावेश न केल्यामुळे मी निराश आहे. याच कारणामुळे मी विधिमंडळ अधिवेशनास उपस्थित राहणार नाही. माझ्यावर काही आरोप करण्यात आले होते. मात्र आता मी निर्दोष असल्याचा निर्वाळा तपास संस्थांनी दिला आहे. त्या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नव्हती, हे कर्नाटकमधील जनतेला माहिती आहे. तो खटला बंद करून मला क्लीनचीट देण्यात आलेली आहे. माझे निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतर माझा परत मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप तसे झालेले नाही. मला अजूनही खात्री आहे की माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> त्रिपुरा : “भाजपाच्या पराभवासाठी काहीही करू,” काँग्रेसचे विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन

मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मला मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल असे आश्वासन माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी दिले होते, त्यांना याबाबत विचारले पाहिजे, असेही ईश्वरप्पा म्हणाले.

हेही वाचा >>> महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये घेण्यात आला आहे ‘हा’ मोठा निर्णय, देशात असं पहिल्यांदाच घडणार

ईश्वरप्पा यांच्यावर काय आरोप होता?

कर्नाटकमध्ये पाटील नावाच्या एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांनी ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. हा कंत्राटदार भाजपाचा स्थानिक कार्यकर्ता होता. त्याने मृत्यूपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी ईश्वरप्पा आणि त्यांचे लोक कमिशन मागत असल्याचे नमूद केले होते. याच कारणामुळे ईश्वरप्पा यांना ग्रामविकास मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 13:40 IST
Next Story
अमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची मोर्चेबांधणी आतापासून सुरू