सातारा म्हणजे उदयनराजे भोसले हे समीकरण राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत मोडून काढले होते. यंदा बेरजेचे राजकारण करीत साताऱ्याचा गड पुन्हा सर करण्यासाठी उदयनराजे सरसावले असले तरी राष्ट्रवादीचे आव्हान त्यांच्या समोर असेल. तसेच लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून सतत राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकत असल्याने कमळ फुलविण्यासाठी उदयनराजे यांना सारी ताकद पणाला लावावी लागेल.

मागील दोन अडीच वर्षांत राज्यातील झालेल्या घडामोडींचा मोठा परिणाम सातारा मतदारसंघाच्या राजकारणावर झाला आहे. महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हे तीनही पक्ष सातारा लोकसभेसाठी टोकाचे आग्रही आहेत. भाजपाकडून उदयनराजे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) नितीन पाटील आणि शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांची नावे चर्चेत आहेत. यातील पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र या पक्षाचे सध्याचे कुमकुवत पक्ष संघटन असल्याने याचा विचार किती होतो हे महायुतीच्या तिकीट वाटपाच्या बैठकीत ठरेल. भाजपाने मात्र मागील दीडएक वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपाकडून उदयनराजे यांना पुढे करून होत आहे. उदयनराजेंनीही बेरजेचे राजकारण करत पक्ष आणि महायुतीतील स्थानिक आमदार नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांशी त्यांचा संपर्क आहे. त्यांनी नियमित साताऱ्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे.

akola, political parties, kunbi caste, majority voters, lok sabha 2024, bjp, vanchit bahujan aghadi, maharashtra politics,
अकोला लोकसभा मतदारसंघात गठ्ठा मतपेढीवर लक्ष, कुणबी समाज केंद्रस्थानी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – ”३७० जागा जिंकणं श्यामाप्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली”; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

मी म्हणजे पक्ष आणि पक्ष गेला खड्ड्यात असे म्हणणारे, उदयनराजे आज भाजपच्या अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत. कार्यक्रमांमध्ये संघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ते सोबत घेत आहे. मागच्या पराभवाची पुनरावृत्ती नको, कोणाचा रोष नको यासाठी उदयनराजे आणि त्यांचे सहकारी कटाक्षाने प्रयत्न करत आहेत. महायुतीतून जे उमेदवारी मागत आहेत ते माझ्यासाठीच मागत आहेत असे सांगत उदयनराजेंनी आपल्या उमेदवारीचे सुतोवाच केले आहे. साताऱ्याची यावेळची निवडणूक मात्र उदयनराजेंवरच केंद्रित होणारच असल्याचे सध्यातरी चित्र आहे. तसाच प्रयत्न भाजपाकडूनही सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची की नवीन उमेदवाराला संधी द्यायची याचाही निर्णय लवकरच होईल. त्यांच्यानंतर सारंग पाटील यांचे नाव चर्चेत आहे. पक्ष फुटीचा व त्यानंतर घडलेल्या राजकारणाच्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार गट उचलणार यात शंका नाही. साताऱ्यात शरद पवार आणि अजित पवार यांचा जनसंपर्क गावोगावी आहे. अनेक कार्यकर्त्यांना नावानिशी दोघेही ओळखतात. एकत्रित पक्ष संघटन आणि अनेक संस्था ताब्यात आहेत. या निवडणुकीत खरी लढाई शरद पवार गट आणि उदयनराजे अशीच होण्याची शक्यता जास्त आहे.

उदयनराजेंच्या विजयासाठी भाजपाला अजित पवार यांना सोबत घ्यावेच लागेल. मात्र साताऱ्यातील नेत्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्यावर पक्षाने निवडणूक लढविण्यासाठीचा दबाव आहे. यासाठी मुंबईत पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली होती.

मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. यापूर्वी राष्ट्रवादीच्या उदयनराजे यांनी २०१४ च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये त्यांची आघाडी निम्म्याने घटली होती. याचे शल्य त्यांना होत. त्यावेळी एक लाख २६ हजार ५२८ मतांनी विजय मिळवला होता. २०१९च्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या प्रचाराचा नारळही फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली. मात्र शरद पवारांच्या पावसातील सभेने श्रीनिवास पाटील यांचा विजय सुकर झाला होता. श्रीनिवास पाटील यांना ८७ हजार ७१७ मतांची आघाडी मिळाली होती. यावेळचा उदयनराजेंचा पराभव उदयनराजे गटासाठी हा मोठा धक्का होता.

हेही वाचा – पंजाबचे मुख्यमंत्री नव्या भूमिकेत; केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेत मध्यस्थ म्हणून भगवंत मान यांची महत्त्वपूर्ण भूमिका

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जावळी, वाई खंडाळा महाबळेश्वर, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघ येतात. येथे भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे व शंभूराजे देसाई राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असे आमदार आहेत. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या तालुक्यांमध्ये उदयनराजेंना अंतर्गत विरोध आहे. तर सातारा जावलीमध्ये त्यांना आघाडी मिळू शकते. एकूणच उदयनराजेंसाठी निवडणूक सहज सोपी नाही त्यांना फार शिकस्त करावी लागेल. त्यावेळी बेरजेचे राजकारण किती कामाला आले ते कळेल.

२०१९ लोकसभा मिळालेली मते –

उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) : ५,७९,०२६

नरेंद्र पाटील (शिवसेना) : ४,५२,४९८

पोटनिवडणूक – ऑक्टोबर २०१९

श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) : ६,३६,६२०

उदयनराजे भोसले (भाजप) : ५,४८,९०३