आजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये केरळमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही कोंडी फोडण्याचे भाजपाने ठरवले असून त्यासाठी काही मतदारसंघ निश्चित करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि त्यानंतर त्रिसूर इथे झालेल्या महिला मोर्चाला मिळालेला प्रतिसाद यातून भाजपाची लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

आणखी वाचा: राजस्थानमधील भाजप सरकारला मोठा धक्का, मंत्रीच पराभूत

Bhiwandi Lok Sabha Constituency, election 2024, Maha Vikas Aghadi, mahayuti, Suresh mhatre alias Balya Mama
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका
Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
sunetra pawar marathi news, sharad pawar marathi news
…अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुनेत्रा पवारांनी हातच जोडले !
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…

त्रिसूरवर लक्ष

एरवी केरळमध्ये सर्वत्र पाय कसे पसरता येतील यासाठीचे निमित्त म्हणून निवडणुकांचा वापर भाजपा आजपर्यंत करत आली आहे. मात्र या खेपेस त्या ऐवजी मोजक्याच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून तिथून उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाने लक्ष केंद्रित केलेल्या मतदारसंघांमध्ये त्रिसूरचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे राजकारणात प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी यांनी ही जागा लढवली. त्यांना २८.२% मते मिळाली. त्यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत भाजपा उमेदवार के. पी. श्रीसन यांना ११.१५% मते मिळाली होती. गोपी यांच्या लोकप्रियतेचा गेल्या खेपेस भाजपाला फायदा झाला. आता पुन्हा एकदा गोपी हेच उमेदवार असणार असे संकेत भाजपाने दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोमध्येही गोपी त्यांच्याबरोबर होते. याशिवाय या मतदारसंघातील ख्रिश्चन मतदारही भाजपाबरोबर येतील, अशी पक्षाला अपेक्षा आहे. अलीकडेच त्यासाठी पक्षाने ख्रिश्चन बांधवांना साद घालत नाताळही साजरा केला होता.

आणखी वाचा: अजित पवार यांना कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे शक्तिप्रदर्शनातून प्रत्युत्तर

शशी थरूर यांना आव्हान

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरुवनंतपुरमच्या लोकसभा मतदारसंघावरही भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनाच इथून चौथ्यांदा उमेदवारी मिळणार, अशी चिन्हे आहेत. या मतदारसंघामध्ये भाजपाने सीपीआय(एम)ला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर २०१४ साली झेप घेतली. भाजपाचे वरिष्ठ नेते ओ. राजगोपाल यांना तब्बल ३२.३२ टक्के मते मिळाली, तर थरूर यांना ३४.०९ टक्के मते मिळाली. भाजपा आणि काँग्रेसमधील मतांचे अंतर इथे सर्वात कमी होते. त्याही पूर्वीच्या निवडणुकीत २००९ साली राजगोपाल यांना केवळ २० टक्के मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत भजपातर्फे कुम्मनम राजशेखरन उभे होते, त्यांना ३१ टक्के मते मिळाली. थोडा जोर लावला तर ही जागा भाजापाच्या खिशात येईल, अशी पक्षाला अपेक्षा आहे. संघ परिवाराच्या पलीकडेही राजगोपाल यांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात असून हा वर्ग हिंदूबहुल आहे; हा भाजपाकडे वळेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे.

आणखी वाचा: पांचजन्यमधून गंभीर आरोप; तरीही अयोध्या कार्यक्रमासाठी मूर्तींना विशेष आमंत्रण, कारण काय? 

नायर समाजही भाजपाबरोबर

पथानमथिट्टा हा मतदारसंघही भाजपाच्या अजेंड्यावर आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अंतो अँटोनी इथून निवडून आले. २०१९ साली भाजपाने त्यांचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना इथून उमेदवारी दिली, ते तिसऱ्या स्थानावर होते. मात्र पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी १५.९५ वरून थेट २८.९७ वर नेण्यात त्यांना यश आले. शबरीमलाच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव या मतदारसंघात पाहायला मिळाला आणि त्या आंदोलनात भाजपाने आघाडी घेतली होती, त्याचा फायदा या खेपेस लोकसभा निवडणुकीत होईल, असे भाजपाला वाटते आहे. या मतदारसंघात ३५ % ख्रिश्चन मतदार आहेत. शिवाय हिंदूंमध्ये उच्च जातीतील मानला जाणारा नायर समाज २० टक्क्यांहून अधिक आहे, तो भाजपाला साथ देईल, अशी अपेक्षा आहे. इथेही ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर करून पाहिला. हा समाज गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसपासून दूरावला असून त्याने सीपीआय(एम)ला आपलेसे केले आहे. या बदललेल्या समीकरणामुळे २०२१च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या जागा सीपीआय(एम)ने जिंकल्या.

शबरीमला आंदोलनाचा प्रभाव

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील अट्टिनंगल हा मतदारसंघ डाव्यांकडे होता. मात्र गेल्या खेपेस काँग्रेसच्या अदूर प्रकाश यांनी हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिरावून घेतला. केरळ भाजपाच्या महिला प्रमुख शोभा सुरेंद्रन यांनी गेल्या खेपेस इथून निवडणूक लढवत २४.१८ टक्के मते मिळवली होती. भाजपाला त्यापूर्वीच्या निवडणुकीत इथे फक्त १०.६ टक्के मतेच मिळाली होती. शबरीमला आंदोलनाचा प्रभाव इथेही डाव्यांविरोधात पाहायला मिळाला आणि त्या आंदोलनाचे नेतृत्त्व भाजपाने केले होते. मागास हिंदू इझावा समाज इथे मोठ्या प्रमाणावर असून या खेपेस त्याच समाजातील उमेदवार उभा करण्याचा निर्णय प्रदेश भाजपाने घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीतही प्रमुख राजकीय पक्षांनी इझावा समाजातील उमेदवारांनाच प्राधान्य दिले होते.

आजपर्यंत केरळमध्ये मतदारांचे मन वळविण्यासाठी भाजपाने अनेकविध प्रयत्न करून पाहिले. कधी माजी सनदी अधिकारी, कधी कलाकार, सेलिब्रेटिज तर कधी क्रीडापटू असे सर्व प्रयोग झाले. सीपीआयएमसारखी कार्यकर्त्यांची तळागाळात झिरपलेली फळीही येथे भाजपाकडे नाही. मात्र आजपर्यंत सीपीआयएम बरोबर असलेला इझावा समाज या खेपेस भाजपाबरोबर आल्याने यंदा पारडे जड असेल, असे भाजपाला वाटते आहे.