तृणमूल काँग्रेसने (TMC) लोकसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्री बिप्लब मित्रा यांना बालूरघाटचे विद्यमान खासदार आणि उमेदवार सुकांता मजुमदार यांच्याविरोधात उभे केल्यानं इथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. प्रदेश पक्षाध्यक्ष म्हणून मजुमदार यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची विशेष रणनीती आखण्याची जबाबदारीसुद्धा आहे. सुकांता मजुमदार यांनी इंडियन एक्सप्रेसला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत पक्षाची रणनीती अन् राज्यातील प्रश्न, CAA, TMC भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील हिंसाचारासंदर्भात दिलखुलास मते व्यक्त केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा पश्चिम बंगालमध्ये किती जागा जिंकेल?

राष्ट्रीय पातळीवर भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी किमान ३७६ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. एनडीए ४०० चा टप्पा पार करेल आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बंगालमधून आम्हाला ३० जागांची गरज आहे, ज्या आम्ही नक्कीच जिंकू. राज्यात आम्हाला ३५ जागाही मिळू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

बंगालमध्ये भाजपाच्या प्रचाराचा फोकस काय आहे?

बंगालमधील भाजपाच्या मोहिमेमध्ये आम्ही दोन व्यापक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे टीएमसीने लोकांवर केलेल्या अन्यायाबाबत आम्ही प्रचार करीत आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या विकासावर प्रकाश टाकत आहोत.

बंगालमध्ये सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांकडे तुम्ही कसे पाहता?

बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. असे लोक ममता बॅनर्जींचे आवडते आहेत. त्यांना बंगाल हे राज्य जातीयवादी आणि भारताविरोधी कारवायांचे पाळणाघर करायचे आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांची अडवणूक होत आहे. मी राज्यातील धर्मनिरपेक्ष लोकांना आणि विचारवंतांना बंगाल वाचवण्याची हाक देऊ इच्छितो. राज्य वाईट हातात असल्याने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ममता बॅनर्जींचे पोलीस एनआयएवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करीत आहेत.

हेही वाचाः केरळमध्ये पलक्कड जिंकण्यासाठी भाजपानं आखली रणनीती, नेमकी योजना काय?

बंगालमध्ये घुसखोरीची समस्या आहे का?

मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. बालूरघाट लोकसभा मतदारसंघ सीमावर्ती जिल्ह्यात असल्याने येथे निर्वासितांचा ओढा आहे. हिंदू निर्वासितांचे नेहमीच स्वागत आहे. कोणत्याही हिंदू बंगालींवर अत्याचार होत असल्यास त्यांना पश्चिम बंगाल राज्यात येण्याचा अधिकार आहे. हे राज्य श्यामा प्रसाद मुखर्जी आणि इतर नेत्यांनी बंगाली हिंदूंसाठी निर्माण केले होते. इतर लोक इथे राहू शकतात, पण बंगाली हिंदूंचा इथे येऊन राहण्याचा पहिला हक्क आहे. इथे घुसखोरी ही मोठी समस्या आहे. सीमेवरून घुसखोरी करणारे फक्त सामान्य लोकच नाहीत तर जातीय कृत्यांचे सूत्रधारही आहेत. आधीच बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर ७१ चेक पोस्टची योजना आखली आहे. अमित शाहांनी स्वतः नबन्ना येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि जमिनीसाठी विनंती केली. पण बंगालच्या मुख्यमंत्री बीएसएफसाठी केंद्रीय गृह मंत्रालयालाही कोणतीही जमीन देत नाही आहेत.

सीएए अंतर्गत अर्ज करू नयेत, असे मुख्यमंत्री लोकांना सांगत आहेत आणि त्यांनी असे केल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाईल का?

आपल्या पहिल्या जाहीर सभेत अमित शाह यांनी स्पष्ट केले की, ममता बॅनर्जी केवळ प्रचार करीत आहेत. त्यात आणखी काही नाही. CAA मुळे तुम्हाला काही समस्या आल्यास कृपया माझ्याकडे किंवा भाजपाकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू. कोणतीही अडचण येणार नाही. लक्ष्मी भंडार (राज्य सरकारची थेट लाभ योजना) चा लाभ कोणीही गमावणार नाही.

तुम्ही मतदारांना काय सांगत आहात?

तुम्ही आम्हाला पाच वर्षांपूर्वी संधी दिली आणि आम्ही विकास घडवून आणला, जो आता ठळकपणे दिसतो आहे. त्यामुळे या वेळी लोक आम्हाला मतदान करतील आणि आमचे मताधिक्य वाढेल, असे मला वाटते.

बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका, सुरक्षा व्यवस्थेचे काय?

बंगालसाठी सर्वाधिक केंद्रीय दले मंजूर करण्यात आली आहेत. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते. राज्यात सुरक्षा दल लवकर तैनात केले पाहिजे, असे मला वाटते. आपल्याकडे मतदानानंतरच्या हिंसाचाराचा इतिहास आहे. तो एक वाईट वारसा आहे. निवडणुकीनंतर दोन-तीन महिने केंद्रीय सैन्यानेही बंगालमध्ये राहावे, असे आम्हाला वाटते. अन्यथा ही लोकशाहीची थट्टा ठरेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली, परंतु २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत बंगाल जिंकण्यात अपयश आले, त्याकडे कसे पाहता?

त्यावेळी आमची नजर २०० विधानसभेच्या जागांवर होती, पण मतदान प्रक्रियेदरम्यान आमच्याकडून मार्ग निवडण्यात चूक झाली. यावेळी आम्ही सर्व त्रुटी दूर करण्याचा विचार करीत आहोत आणि TMC पेक्षा किमान एक जागा जास्त जिंकू आणि तसे झाले तर बंगालमधील राज्य सरकार कोसळेल.

संपूर्ण बंगालमध्ये भाजपाकडे पुरेशी संघटनात्मक ताकद आहे का?

२०१९ मध्ये आम्ही १८ जागा जिंकल्या. मी तुम्हाला खात्री देतो की, आता आमच्याकडे अधिक मजबूत संघटनात्मक रचना आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही यावेळी जागांची संख्या दुप्पट करू शकतो.

भाजपा आणि एनआयएवर गंभीर आरोप करत तृणमूल काँग्रेसने दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले

तो फक्त एक मेलोड्रामा आहे. त्यांना डायमंड हार्बरमध्ये झालेल्या जातीय संघर्षावरून लक्ष वळवायचे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata govt will fall even if it wins 1 seat more than tmc bengal bjp chief claims vrd
Show comments