भारतीय जनता पार्टीने एका मध्ययुगीन मुस्लीम शासकाच्या नावाचा वापर आपल्या प्रचारासाठी सुरू केल्याने जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एका मुस्लीम शासकाचे नाव वारंवार घेतले जात असून त्याद्वारे हरियाणातील मुस्लिमांची मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सोळाव्या शतकातील मेवातचे मुस्लीम शासक हसन खान मेवातीवरून आता हरियाणामधील राजकारण तापले आहे. नूहमधील एका प्रचार सभेमध्ये बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शासक हसन खान मेवातीचा अनेकवेळा उल्लेख करत मुस्लिमांची मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

राजा मेवातीने १५२६ मध्ये पानिपतच्या लढाईत तसेच १५२७ मध्ये खानवाच्या लढाईत मुघल सम्राट बाबरविरुद्ध लढा दिला होता. खानवाच्या लढाईमध्ये बाबरशी दोन हात करताना त्याचा मृत्यू झाला होता. मुघल शासक बाबरशी हातमिळवणी न करता मेवाडचा शासक राणा सांगाबरोबर एकत्र येत वीरमरण पत्करल्याचा उल्लेख भाजपाकडून करण्यात येतो आहे. राजा मेवातीच्या नावाचा वापर करून हरियाणातील नूह भागातील मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. नूह जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हा भाग गुडगाव लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. २००९ पासून भाजपाचे राव इंद्रजीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अजय सिंह यादव यांचा ३.८६ लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते राज बब्बर यांच्याशी आहे.

Singletoli, person attacked, weapon,
गोंदिया : सिंगलटोली संकुलात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
China Ambassador Feihong said that China is always grateful for the humanitarian service of Dr Kotnis
डॉ.कोटणीसांच्या मानवतावादी सेवेबद्दल चीन देश सदैव ऋणी ; चीन राजदूत फेहाँग यांचे भावोद्गार
Pm narendra modi in russia
रशियातील पंतप्रधान मोदींच्या भाषणात ‘अस्त्रखान हाऊस ऑफ इंडिया’चा उल्लेख; त्याचे गुजरात कनेक्शन काय?
mihir shah worli hit and run case marathi news
Worli Hit and Run Case: अपघाताआधी मिहीरनं जुहूच्या बारमध्ये १८,७३० रुपयांचं बिल भरलं होतं; मित्रांसोबत पार्टीचं CCTV फूटेज पोलिसांच्या हाती!
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
Hiramandi
ब्रिटिश नाही तर औरंगजेब ठरला होता हीरामंडीच्या ऱ्हासास कारणीभूत; संजय लीला भन्साली यांच्या कथानकात किती सत्य?
Rohit Sharma Mother Wrote Insta post
टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या आईची खास पोस्ट, मुलाचं कौतुक करत म्हणाल्या..

हेही वाचा : मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण

हरियाणामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सात टक्के असली तरी नूहमध्ये त्यांची लोकसंख्या ७९ टक्के आहे. त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न म्हणून अलीकडच्या आठवड्यात भाजपा नेत्यांनी राजा मेवातीचे नाव घेऊन या ठिकाणी जोरदार प्रचार केला आहे. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील १० जागांसाठी मतदान होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने या सर्व मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. एका प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटले आहे की, “मी भारत मातेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या हसन खान मेवाती यांच्यासमोर नतमस्तक होतो. राजा मेवातींचा जन्म झाल्यामुळे ही माती पवित्र झाली आहे. राजा मेवाती आणि त्यांच्या बारा हजार सैनिकांनी बाबरशी लढताना मृत्यू पत्करला, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. गेल्या अनेक वर्षांपासून एकाही सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेतली नव्हती. मात्र, माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी त्यांच्या नावे हुतात्मा दिन सुरू केला, ही आनंदाची बाब आहे.” मुख्यमंत्री सैनी पुढे म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांमध्ये, मेवातकडे फक्त व्होट बँक म्हणून पाहिले गेले; मात्र इथे अलीकडच्या काळात विकास होतो आहे. विरोधकांनी आजवर फक्त खोटी आश्वासने देत व्होट बँकेचे राजकारण केले आहे.”

याआधी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ९ मार्च रोजी नूह येथील मदकाली चौकामध्ये हसन खान मेवाती यांच्या पुतळ्याचे अनावरण करून या दिवसाला ‘हुतात्मा दिन’ म्हणून घोषित केले होते. आजवर कोणत्याही सरकारने राजा मेवातीचे स्मरण केले नसल्याचा दावा करून खट्टर म्हणाले होते की, त्यांच्याबाबत अधिक संशोधन व्हावे यासाठी नलहरमधील शहीद हसन खान मेवाती मेडिकल कॉलेजमध्ये संशोधन समिती स्थापन केली जाईल. विशेष म्हणजे त्यांच्या नावे हे कॉलेज काँग्रेसच्याच काळात स्थापन करण्यात आले होते. खट्टर यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावरही राजा मेवातीची आठवण काढली होती. ते म्हणाले होते की, “मेवातमधील एकता भंग करण्याचे काम काही बाहेरच्या शक्ती करत आहेत. मात्र, मेवातमधील लोकांनी हुतात्मा राजा मेवाती यांच्या देशभक्तीतून प्रेरणा घेऊन बंधुभावाची भावना जोपासली पाहिजे.” गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये नूह आणि त्या परिसरामध्ये धार्मिक दंगल झाली होती. या दंगलीनंतर पहिल्यांदाच खट्टर मुस्लीम समाजाला संबोधित करताना दिसले होते.

संघ परिवाराकडूनही राजा मेवातीचा उदो-उदो

याआधी, संघ परिवारानेही मुस्लीम राजा मेवातीचे नाव अनेकदा घेतले आहे. २०१५ मध्ये राजस्थानमधील भरतपूरमध्ये बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते की, “मेवाडचा शासक राणा सांगाचा योद्धा हसन खान मेवातीने बाबरच्या सैन्यात सामील होण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता, म्हणूनच तो भारतमातेचा पुत्र होता. त्याची भाषा, जात आणि धर्म हे बाबरप्रमाणेच असले तरीही तो पहिला भारतीय आणि भारतमातेचा सुपुत्र होता.” पुढे २०२१ मध्ये एके ठिकाणी बोलताना सरसंघचालकांनी मुस्लिमांनी राजा मेवातीप्रमाणेच देशभक्त व्हावे, असेही विधान केले होते.

कोण आहे राजा मेवाती?

राजा हसन खान मेवाती हा मेवातचा खानजादा वंशाचा मुस्लीम शासक होता. त्याला शाह-ए-मेवात आणि दिल्लीचा कोतवाल म्हणून ओळखले जायचे. तो दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा चुलत भाऊ होता. बाबरने १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव केला होता. इथूनच भारतात मुघलांचे राज्य सुरू झाले होते. या युद्धामध्ये फक्त लोदीचा नव्हे तर हसन खान मेवातीच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता. तसेच बाबरने राजा मेवातीच्या मुलाला ओलिस म्हणून ताब्यात घेतले होते. इतिहास संशोधक सिद्दीक अहमद मेओ यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “राजा मेवातीने मेवाडचे राजा राणा सांगा यांच्याबरोबर हातमिळवणी केली होती. बाबरने वाटाघाटी करताना मेवातीच्या मुलाच्या बदल्यात मेवातीने आपल्याबरोबर यावे, असा प्रस्ताव दिला होता. आपण दोघेही मुस्लीम असून एकत्र आले पाहिजे, अशी त्याची इच्छा होती. मात्र, राजा मेवातीने हा प्रस्ताव फेटाळला. याउलट इब्राहिम लोदीचा लहान भाऊ मुहमद लोदी आणि मेवाडचा राजा सांगा यांच्याबरोबर एकत्र येत राजा मेवातीने १५२७ मध्ये बाबरविरोधात खानवाचे युद्ध लढले. सांगा आणि लोदी यांनी जखमी झाल्यानंतर या युद्धातून माघार घेतली. मात्र, राजा मेवातीने शौर्याने लढत मरण पत्करले. या युद्धात बाबराचा विजय झाला असला तरीही राजा मेवाती यांच्या शौर्याची आठवण आजही काढली जाते. सध्या त्यांचा राजकीय वापर केला जातो आहे”, असे इतिहास संशोधक सिद्दीक अहमद मेओ यांनी म्हटले.

हेही वाचा : Queen Vs Shehzada: कंगणा रणौत आणि विक्रमादित्य सिंह यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?

राजा मेवातीवरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, “इथले राजकारणी मुस्लीम मतांसाठी गेल्या २० वर्षांपासून राजा मेवातीच्या या इतिहासाला अधिक उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही राजा मेवातीशी निगडीत सर्व ऐतिहासिक कागदपत्रे शोधून काढली आहेत. भाजपाने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ही कागदपत्रे आणि मेवातीचे चित्रण मागवले होते. आम्ही त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली. मात्र, त्यांनी उभा केलेला पुतळा फारच वेगळा आहे. राजा मेवाती यांना राजपूत शैलीतील दाढी होती. मात्र, तरीही भाजपाने उभ्या केलेल्या या पुतळ्याला इस्लामिक चेहरा देण्यात आला आहे. लोकांनी यावर आक्षेप घेतला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले”, असे सिद्दीक यांनी म्हटले आहे.