पश्चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दानिश अली निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच कुंवर दानिश अली यांनी बसपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक बसपाच्या तिकिटावर जिंकली होती आणि भाजपा उमेदवार कंवर सिंह तन्वर यांचा पराभव केला होता. खरं तर या मतदारसंघाने उत्तर प्रदेशचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण इथे प्रचारासाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसकडून राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीकडून अखिलेश यादव, बसपाकडून मायावती असे सगळेच दिग्गज येऊन गेले आहेत. बसपातून काँग्रेसमध्ये गेलेले नेते कुंवर दानिश अली हे अमरोहाचे विद्यमान खासदार असून, २६ एप्रिल रोजी मतदारसंघात मतदान करणार आहेत. मोदी आणि मायावतींनीही त्यांच्या सभांमध्ये दानिश अली यांचा आवर्जून उल्लेख केला आहे. मायावतींनी आपल्या भाषणात अलीवर पक्ष आणि अमरोहाच्या लोकांशी विश्वासघात केल्याचा आरोप केला, त्यांची हकालपट्टी केल्यानंतर मायावती पहिल्यांदा या विषयावर उघडपणे बोलल्या आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याबद्दल आणि ‘भारत माता की जय’ या घोषणेला आक्षेप घेतल्याबद्दल मोदींनी अलींवरही हल्ला चढवला. “ज्याला आपल्या मातृभूमीबद्दल कृतज्ञता दाखवायला आवडत नाही, अशा व्यक्तीला संसदेत प्रवेश द्यावा का?, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केलाय. सपा-काँग्रेस आघाडीचे संयुक्त उमेदवार अली यांचा अमरोहामध्ये बसपाचे मुजाहिद हुसेन आणि भाजपाचे कंवरसिंग तन्वर यांच्याशी सामना आहे. हुसेन यांची पत्नी गाझियाबाद जिल्ह्यातील नगर पंचायत सदस्य आहे, त्या सपा-काँग्रेसच्या मुस्लिम मतांमध्ये फूट पाडू शकतात, तर तन्वर (गुज्जर नेता) यांचा अमरोहा येथे बेस आहे. २०१४ मध्ये त्यांनी १.५८ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. २०१९ मध्ये बसपा आणि सपा यांचे संयुक्त उमेदवार म्हणून लढत असलेल्या अली यांनी तन्वर यांचा ६३,२४८ मतांनी पराभव केला होता. अली यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मोदी आणि मायावती यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Narendra Modi
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं कोलकात्यातील बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान; लाल किल्ल्यावरून भाषणात म्हणाले, “काही चिंताजनक गोष्टी…”
Kirit Somaiya probe ins vikrant
Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश
Sheikh Hasina demand to investigate the Bangladesh violence murders
हिंसाचार, हत्यांची चौकशी करा! शेख हसिना यांची मागणी, राजीनाम्यानंतर पहिलेच जाहीर वक्तव्य

हेही वाचाः मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!

पंतप्रधानांनी तुमच्यावर केलेला हल्ला कसा पाहता?

मुळात पंतप्रधान आणि संपूर्ण भाजपा अडचणीत आहे, कारण १७ व्या लोकसभेत त्यांना नाराज करणाऱ्या काही खासदारांपैकी मी एक होतो. जेव्हा त्यांचे सरकार आणि पक्ष शेतकरी, महिला आणि तरुणांच्या विरोधात काम करतात, तेव्हा मी त्यांना नेहमीच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. सतत आवाज उठवणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये मी पहिला होतो. त्यामुळेच मला त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सभागृहात शिवीगाळ केली. त्या प्रकारानंतर त्यांचे बरेच खासदार आणि नेते बाहेर आले आणि म्हणाले की, दानिश अली नेहमी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना त्रास देतात, जेव्हा ते सभागृहात येतात आणि बोलतात. त्यांनी लोकविरोधी विधेयके आणली, तेव्हा मीच त्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळेच ते माझ्यावर हल्ला करीत आहेत. ५२ वर्षे मुख्यालयावर राष्ट्रध्वज न फडकावलेल्या संघटनेतून (RSS) आलेले पंतप्रधान माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे हे लज्जास्पद आहे. माझ्या पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्राणांची आहुती दिली आहे.

हेही वाचाः “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?

मायावतींनी तुमच्यावर हल्ला का केला?

बसपा इंडियाच्या आघाडीत का सामील झाला नाही हे लोकांना आता समजले आहे. मी बसपाचे संस्थापक (कांशीराम) यांच्या वैचारिक पायासाठी उभा होतो. मात्र आता विविध कारणांमुळे सध्याच्या नेतृत्वावर तडजोडीचा दबाव आला आहे. लोकांना ते समजले आहे आणि ते माझ्याबरोबर आहेत. दानिश अलीचा पराभव करण्यासाठी बसपा आणि भाजपा एकत्र काम करीत आहेत. महोदय पंतप्रधान मतदारांचे ध्रुवीकरण करू शकत नाहीत. मंगळवारी अमरोहा येथे दोन आठवड्यांत मुख्यमंत्र्यांची चौथी बैठक आहे.

तुम्ही २०१९ मध्ये बसपा-सपा युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता तुम्ही काँग्रेस-सपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात. दोन युतींमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो?

माझा वैचारिक सहकारी आणि वैचारिक बांधिलकी एकच आहे. बसपाने पुढे जाऊन भाजपाला मदत केली आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की, बसपा भाजपाला मदत करण्यासाठी एकटी लढत आहे. बसपा आणि भाजपामध्ये काही फरक नाही. आता ही खुली युती आहे.

त्यांचे हल्ले तुम्हाला निवडणुकीत आघात करीत आहेत का?

प्रत्येक समाजाची मते मला मिळत आहेत. मुस्लिम येथे बसपाच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत. काही चांगल्या बिगर मुस्लिम उमेदवारांना बसपाचे तिकीट हवे होते आणि त्यांना मैदानात उतरवले असते तर कदाचित तिरंगी लढत झाली असती. मात्र दानिश अली यांना पराभूत करण्याचे ध्येय ठेवून बसपा नेतृत्वाने मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. पण ते माझ्या मतांमध्ये फूट पाडू शकणार नाहीत. पंतप्रधान वैयक्तिकरीत्या माझ्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. मी देशातील अशा काही लोकांमध्ये आहे, ज्यांनी लोकसभेत प्रवेश केल्याने पंतप्रधान घाबरतात.

कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढवत आहात?

लोकशाही आणि राज्यघटना वाचवणे आणि बेरोजगारी हे इथले मुद्दे आहेत. काही स्थानिक बाबींव्यतिरिक्त परीक्षेचे पेपर फुटणे हीदेखील एक समस्या आहे. आता काँग्रेसनेसुद्धा जाहीरनाम्यातून २५ आश्वासनं दिली आहेत.