महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असले तरी विरोधी पक्षांनी उमेदवार दिल्यास भाजपच्या उमेदवारासाठी देशभरातील छोटे पक्ष, अपक्ष खासदार-आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने रणनीती आखत त्याची मुख्य जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. त्याचबरोबर या कामी त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर सहसंयोजकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारही यांचाही त्यात समावेश आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी व अन्य अशी रचना करण्यात आली आहे. गजेंद्र शेखावत हे या समितीचे संयोजक असून विनोद तावडे यांना सहसंयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या रूपात महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेना अन् विरोधी भाजपमध्ये गोडीगुलाबी

भाजपशासित राज्यांमध्ये मतांचे नियोजन योग्यपद्धतीने व्हावे आणि मित्र पक्ष, इतर छोटे पक्ष, अपक्ष खासदार-आमदार यांच्या मतांची जुळवाजुळव भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी करण्याचे काम राजनाथ सिंह आणि विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आले आहे. विविध पक्षांच्या, अपक्ष खासदार-आमदारांशी संवाद साधून, त्यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराला मत देण्यासाठी त्यांना राजी करण्याचे काम या नेत्यांवर सोपवण्यात आले आहे. त्यासाठी या अपक्ष खासदार-आमदार, छोट्या पक्षांचे नेते यांच्यासोबत बैठकाही सुरू करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election bjp rajnath singh with vinod tavde politics print politics news pmw
First published on: 18-06-2022 at 15:17 IST