तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी तीन नवीन नावांचा उल्लेख आहे. तृणमूलचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि ३५ वर्षीय साकेत गोखले यांच्याही नावाचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि माजी पत्रकार असलेल्या साकेत गोखले यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता. साकेत यांचे वडील माजी पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्राचा अभ्यास केला आहे. चेक प्रजासत्ताकमधील शाळेत शिक्षक म्हणून २००८ साली त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर एका इंग्रजी दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम केले. युरोप आणि दक्षिण आशियाच्या बातम्या ते देत होते. काही भारतीय वर्तमानपत्रातही अगदी छोट्या कालावधीसाठी त्यांनी काम केले होते. त्यानंतर मात्र आरटीआय कार्यकर्ते म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

साकेत गोखले यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण देताना गोखले म्हणाले, “तृणमूल काँग्रेस हा संसदेतील दुसरा मोठा विरोधी पक्ष आहे. तुम्ही जर देशातील सर्व विरोधी पक्षांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, तृणमूल काँग्रेस नेहमीच आक्रमक भूमिका घेत आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) पुढे येऊन संघर्ष करत आहेत, मला याच प्रकारचा पक्ष आणि नेतृत्व हवे होते.” तृणमूलमध्ये एक वर्षाहून कमी काळात साकेत गोखले यांच्या प्रगतीचा वेग उल्का वेगाइतका असल्याचे गमतीने म्हटले जाते.

No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?
Vaishali Darekar , uddhav Thackeray shivsena, kalyan lok sabha seat, Vaishali Darekar Files Nomination form, Vaishali darekar kalyan lok sabha, Jitendra awhad, Aditya Thackeray, varun sardesai, maha vikas aghadi, election commission, election officer, kalyan news, marathi news, dombivali news, Vaishali darekar files nomination form,
कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती

मागच्या वर्षभरात साकेत गोखले यांना तीन प्रकरणांमध्ये अटक झाली होती, त्यामुळेही ते वारंवार चर्चेत आले होते. डिसेंबर २०२२ मध्ये गुजरातच्या मोरबी येथे नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्घटनेबाबत साकेत गोखले यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटमधील मजकूर दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनामीकारक, भीता निर्माण करणारा आणि फसवा मजूकर ट्वीट केल्याबद्दल सायबर विभागाने त्यांच्यावर एफआयआर दाखल केला होता. अहमदाबाद येथील रहिवासी बालाभाई कोठारी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांचा आधार घेऊन गोखले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोखले यांच्या ट्वीटमुळे भाजपाचे वरीष्ठ नेते दुखावले असल्याचा आरोप कोठारी यांनी केला होता.

हे वाचा >> विश्लेषण: राज्यपालांच्या भूमिकेने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची पंचाईत? नक्की काय घडले?

सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी काही तासांतच त्यांची जामीनावर मुक्तता झाली. त्यानंतर मोरबी पोलिसांनी याच गुन्ह्यात पुन्हा त्यांना अटक केले. याही अटकेच्या विरोधात त्यांना जामीन मिळाला. २९ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद सायबर गुन्हे पोलिसांनी साकेत गोखले यांना लोकवर्गणीचा गैरवापर केल्याबद्दल पुन्हा अटक केली.

साकेत गोखले यांच्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट केले होते. ते म्हणाले, साकेत गोखले भाजपाच्या रडारवर आलेले आहेत. सूडाच्या भावनेने पेटलेल्या लोकांनी त्याला १५ दिवसांत तीन वेळा अटक केले. साकेत एक चांगला कार्यकर्ता असून आता तो ममता बॅनर्जी यांच्या टीमचा भाग झाला आहे. मेघालयमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकेतला दूर ठेवण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले.

जानेवारी महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) साकेत गोखले यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली होती. लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पीएमएलए कायद्यांतर्गत विविध कलमे दाखल करून गोखले यांना अहमदाबाद येथे तुरूंगात डांबण्यात आले, त्यावेळी गुजरात पोलिसांनी एका खटल्यात अटक केल्यानंतर गोखले आधीच न्यायालयीन कोठडीत होते. ईडी आरोप केला होती की, लोकवर्गणीतून जमा केलेल्या निधीतून एक कोटी रुपये साकेत गोखले यांनी शेअर मार्केटमध्ये इंट्रा डे ट्रेडिंगसाठी गुंतवले होते, तसेच स्वतःच्या कुटुंबातील उपचारावरदेखील हे पैसे खर्च करण्यात आले.

डिसेंबर २०२२ पासून तुरुंगात असलेल्या साकेत गोखले यांना यावर्षी मे महिन्यात जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात अहमदाबाद येथे सायबर गुन्हे विभागाने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात साकेत गोखले यांना जामीन देण्यास परवानगी दिल्यानंतर अहमदाबाद न्यायालयानेही त्यांना जामीन दिला.