राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसतर्फे भाजपाविरोधी विचारधारा असलेल्या २१ राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे सर्वांना पत्र लिहीले आहे. दरम्यान, टीएमसीने काँग्रेसच्या या भूमिकेचं स्वागत केलं केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – …तर भारताचा अफगाणिस्तान होईल; चंद्रशेखर रावांची भाजपावर खरमरीत टीका

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

काँग्रेसचे २१ राजकीय पक्षांना निमंत्रण

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होणासाठी पत्र लिहीले आहे. “भारत जोडो यात्रेच्या सुरुवातीपासूनच आम्ही प्रत्येक भारतीयाला या यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि खासदार या यात्रेत सहभागी झाले आहेत. ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा गांधींच्या स्मृतीस समर्पीत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे”, असं खरगे यांनी पत्रात म्हटले आहे.

टीएमसीकडून काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन

काँग्रेसच्या या भूमिकेचं तृणमूल काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे. “काँग्रेसने भाजपाविरोधात घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला टीएमसीने समर्थन दिलं आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला फायदा होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी दिली आहे. तर टीएमसी नेता समीर चक्रवर्ती याबाबत बोलताना म्हणाले, “या देशात भाजपाला आव्हान देऊ शकेल असा एकमेव पक्ष काँग्रेस आहे. हेच वास्तव आहे. देशातील १७० जागांवर काँग्रेस कमी पडत असल्यानेच भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी आता विखूरलेल्या काँग्रेसला एकत्र करायला हवं.” विशेष म्हणजे ममता बनर्जी भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होईल का? दोघांनी बोलणं टाळलं आहे.

ममता बॅनर्जींनी भूमिका जाहीर करावी

दरम्यान, टीएमसीच्या या प्रतिक्रियेनंतर पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी म्हणाले, “भारत जोडो यात्रेबाबत टीएमसीने घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. मात्र, ममता बॅनर्जी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी.”

हेही वाचा – ‘शोक व्यक्त करताना राहुल गांधी हसत होते,’ भाजपाचा दावा

विविध राजकीय चर्चांना उधाण

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात टीएमसीची भूमिका काँग्रेस विरोधी राहिली आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र लढले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी टीएमसीचे मुखपत्र असलेल्या जागो बांगलामध्ये काँग्रेसवर टीका करण्यात होती. “काँग्रेस हा देशातला मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांचे नेतृत्व एका खोलीपूरते मर्यादीत आहे. काँग्रेसचे नेतृत्व केवळ ट्वीटरवर सक्रीय दिसतात”, असे त्या टीएमसीने म्हटले होते. दरम्यान आता टीएमसीची भूमिका बदलल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आहे.