दिगंबर शिंदे
सांगली : महायुतीचा संसार गेली दीड वर्षे सुखानैव सुरू असताना मित्र पक्षातील मंडळीकडून होणारा त्रास असह्य होत असल्याची खदखद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तीन मंत्र्यासह आमदारांनी विटा येथे व्यक्त केली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आल्याने सरकारमधील शिंदे गटाचे महत्व कमी झाल्याचे दिसत असताना खदखदही वाढली आहे. आजअखेर बंद दाराआड होत असलेल्या तक्रारींना शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावरून खुलेआम पंचनामा करून सर्वांचे पाय मातीतीलच आहेत हे दिसून आले. मित्र पक्षातील घटकाकडून होणारा त्रास बंद करण्यासाठी वरिष्ठांनी उपद्रवकारांना समज द्यावी, असे मत व्यक्त करीत महायुतीच्या समन्वय समितीमध्ये याबाबत तक्रारी करण्याचा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

खानापूर-आटपाडी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व शिंदे गटाचे जेष्ठ नेते अनिल बाबर हे करत आहेत. शिंदे गटातून त्यांना मंत्रीपदाची संधी पहिल्या टप्प्यातच मिळणे अपेक्षित असताना त्यांना विस्तारापर्यंत वाट पाहण्याचा सा देण्यात आला. मात्र नव्याने मंत्रीमंडळ विस्तार आमदार पात्र-अपात्रतेच्या राजकीय तिढ्यामुळे विस्तार पुढे ढकलण्यात आला. शिंदे गटाच्या इच्छुकांना मंत्री होण्याची रोज स्वप्ने पडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजितदादा सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत आलेल्यांना मंत्री पदाची वस्त्रे मिळाली. मात्र, शिंदे गटातील निष्ठावंत अद्याप प्रतिक्षेत आहेत. खानापूर- आटपाडीचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटेल असे सध्या तरी वाटत नसले तरी टेंभू योजनेच्या विस्तारित कामाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मतदार संघाच्यादृष्टीने समाधानकारक बाब मानली जात आहे. याच योजनेचे जनक म्हणून आमदार बाबर यांचा गवगवा, प्रसिध्दी गावपातळीपासून अगदी चार-सहा घरे असलेल्या वाडीवस्तीवरील डिजीटल फलकाद्बारे करण्यात येत आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील हे मात्र टेंभू योजनेला मान्यता मिळवून देण्यात सर्वांचेच योगदान असल्याचे सांगून मीही श्रेयवादाच्या पंगतीत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणामुळे या टेंभू योजनेला गती मिळाल्याचा दावा तासगाव-कवठेमहांकाळचे भावी उमेदवार आमदार पुत्र रोहित पाटील हे करत आहेत.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

आणखी वाचा-हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकासही लोकसभेच्या रिंगणात

नुकताच आमदार बाबर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शेतकरी मेळावा विट्यात पार पडला. या मेळाव्यास शंभूराज देसाई, दिपक केसरकर, उदय सामंत हे मंत्री उपस्थित होते. यावेळी टेंभूचे जनक म्हणून आमदार बाबर यांचे नाव सातत्याने लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न होत असतानाच भाजप, राष्ट्रवादी (दादा गट) या महायुतील स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून होणारा त्रासही अधोरखित करण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे खासदार पाटील आणि आमदार बाबर यांच्यात यशवंत साखर कारखान्यावरून सुरू असलेला वाद जुनाच आहे. आता हा कारखाना माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम गटाच्या ताब्यात गेला असला तरी वाद कायम आहे. दुसर्‍या बाजूला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष व दादा गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून आमदार बाबर यांची राजकीय कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पडळकर यांनी तर गेल्या वेळी झालेली चूक पुन्हा करणार नाही असे सांगत मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. तर त्यांचे बंधू आता यावेळी आटपाडीचे देशमुखच पुढचे आमदार असतील असे सांगून अप्रत्यक्ष आमदार बाबर यांना पराभूत करण्याचा विडा उचलला असल्याचे सांगत आहेत. तर विट्याचे पाटील हेही आमदारकीच्या शर्यतीत आतापासूनच असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठिंब्यावर आपण विधानसभेचा गड लढवूच असे सांगत आहेत.

भाजपच्यादृष्टीने सध्या लोकसभा निवडणुक महत्वाची आहे. जोपर्यंत ही निवडणूक होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांचा स्थानिक संघर्ष हा राहणार आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून याला महत्व दिले जाण्याची शक्यता कमीच. यामुळे महायुतीतील वादाचे वादळ सध्या तरी पेल्यातच राहणार आहे. याची खरी धग लोकसभेच्या निवडणुकीनंतर मिळणार आहे.