ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसची बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असतानाच, या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघात सुमारे ५२ टक्के मुस्लिम मतदार आहे. या मतदारसंघात मुस्लिम मते विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला भिवंडी पश्चिम आणि मिरा भाईंदर मतदारसंघ सुटला आहे. येथील भिवंडी पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन, माजी नगरसेवक विलास पाटील यांच्यासह १८ जण इच्छुक होते. येथून काँग्रसेने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

हेही वाचा – जशास तसे भूमिकेतून शिंदे गटाचे अजित पवार गटाविरुद्ध उमेदवार

हेही वाचा – नाशिकमध्ये पुन्हा नामसाधर्म्याचे डावपेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरघे हे भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात राहतात. त्यांना या भागातून उमेदवारी का देण्यात आली असा प्रश्न काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. या मतदारसंघात ५२ टक्के मुस्लिम समाज वास्तव्यास असल्याने मुस्लिम चेहरा येथून दिला जावा अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी करत होते. तर दुसरीकडे विलास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. सध्या महाविकास आघाडीत समाजवादी पक्ष असल्याचा दावा होत असला तरी येथे समाजवादी पक्षाकडून रियाज आझमी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून आता एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वारिस पठाण हे वांद्रे येथे वास्तव्यास आहेत. सपा, बंडखोर आणि आता एमआयएम उमेदवारांमुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.