ऑपरेशन ब्लू स्टारला ३८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने बोलताना अकाल तख्तचे प्रमुख ग्यानी हरप्रित सिंग म्हणाले की “बादशाहात किंवा राज हे आम्हाला आमच्या गुरूंनी दिलेलेशब्द आहेत. त्यामुळे आम्हाला या शब्दांचा उच्चार प्रार्थनेत नियमितपणे करावा लागतो. शीख कधीही खालसा राज ही संकल्पना नाकारू शकत नाहीत”. 

सध्या वेगळ्या शीख राज्याच्या संकल्पनेवर उहापोह सुरू आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सिमरनजीत सिंग यांनी ही मागणी केल्यामुळे हा विषय चर्चेत आला. ग्यानी हरप्रित सिंग म्हणाले की “जर आपल्याला ‘राज’ मिळवायचे असेल तर आपल्याला खरे खालसा बनावे लागेल”. 

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

खालसा राज म्हणजे काय?

खालसा राज म्हणजे काय ? आणि त्याचा खलिस्थानच्या अलिप्ततावादी विचाराशी संबंध आहे का? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार खालसा राज ही एक समतावादी संकल्पना आहे, जी धर्म किंवा राज्याच्या मर्यादेपलीकडील आहे. अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापिठतील गुरू ग्रंथ साहिब अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. अमरजीत सिंग म्हणाले की ” खालसा म्हणजे शुद्ध. तो कुठल्याही धर्मात भेद करत नाही. आणि खालसा राज म्हणजे त्या सर्वशक्तीमानाचे राज्य”. 

एकेकाळी अकाली दल-भाजपा सरकारमधील मंत्री असलेले डॉ. दलजीत चेमा म्हणाले की ” खालसा राज हा शब्द सिमरनजित मान यांच्याशी जोडू नका. ते नेहमीच खलिस्थानची मागणी करत असतात. पण खालसा राज याचा अर्थ वेगळे राज्य नाही तर धर्म आणि जात भेद नसलेले राज्य असा आहे.  मानवता हा एकच धर्म आहे या शीख धर्माच्या तत्वावर आधारित ही संकल्पना आहे”.

खालसा राज या शब्दाचा प्रथम उल्लेख

डॉ. अमरजीत सिंग म्हणाले की “खालसा हे एकट्या शिखांचे राज्य नसून ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे समतावादी राज्य आहे” १७०० व्या शतकाच्या सुरवातीला ‘प्रेम समर्ग’ ग्रंथातील एका अध्यायात नमूद केलेल्या संकल्पनेविषयी बोलताना अमरजीत सिंग म्हणाले की ” हे एक आदर्श राज्य आहे जिथे कोणावरही अत्याचार होत नाही. जिथे प्रत्येकजण समान असतो”. शिखांसाठी आचारसंहिता लिहिणारे गुरू गोविंद सिंग यांचे दरबारी भाई नंदलाल यांनी १८ व्या शतकातील ‘रेहतनामा’ या मजकुरात ‘खालसा राज’ या शब्दाचा प्रथम उल्लेख केला. १९८२ मध्ये अकालींनी काढलेल्या धर्मयुद्ध मोर्चादरम्यान ‘खालसा राज’ हा शब्द पंजाब राज्याची स्वायत्तता दाखवण्यासाठी वापरला गेला होता.