निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतानाच भाजपाचे उमेदवार उपेंद्र सिंग रावत यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात बोलताना, हा व्हिडीओ बनावट असून डीपफेक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचं रावत म्हणाले होते. तसेच निवडणुकीपूर्वी मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

अशातच उपेंद्र सिंग रावत यांनी आता मोठी घोषणा केली आहे. याप्रकरणी जोपर्यंत मी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Sharad Pawar will contest the election from Baramati know what is exactly matter
बारामतीमधून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात…जाणून घ्या काय आहे प्रकार?
latur, lok sabha election 2024, amit deshmukh, sambhaji patil nilangekar
लातूरच्या प्रचारात अमित देशमुखांची ‘ पुरीभाजी’ तर निलंगेकरांचा “निलंगा भात”
ram arun govil in loksabha bjp
‘प्रभू रामचंद्रां’चे निवडणुकीच्या रणधुमाळीत आगमन; भाजपाचा काय विचार?
Kangana Ranaut Biggest Role
कंगना राणौतची सर्वात मोठी भूमिका; करिअरसाठी जो जिल्हा सोडला, त्याच मंडीतून मिळाली लोकसभेची उमेदवारी

हेही वाचा – बांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी, ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न!

उपेंद्र सिंग रावत हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आहेत. याप्रकरणी आता उपेंद्र सिंग रावत यांचे खासगी सचिव दिनेश सिंग रावत यांनी रविवारी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. संबंधित व्हिडीओ हा खोटा असून डीपफेक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. हा उपेंद्र सिंग रावत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.

दिनेश रावत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १४९, ५०१ तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून संबंधित व्हिडीओ हा दोन-तीन वर्षांपूर्वीचा असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना आम्ही हा व्हिडीओ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असून लवकरच याबाबतचा अहवाल येईल, असे ते म्हणाले.

यासंदर्भात उपेंद्रसिंग रावत यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. “व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ डीपफेक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. याबाबत मी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. तसेच मी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना याबाबत चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने उपेंद्रसिंग रावत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटलं. तसेच त्यांनी व्हिडीओच्या व्हायरल होण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ”भारतीय जनता पक्षाने मला दुसऱ्यांदा बाराबंकी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, त्यानंतर लगेच हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. मी राजकारणात यशस्वी होत असल्याने अनेक लोक नाराज आहेत. त्यांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी माझा बनावट व्हिडीओ प्रसारित केला”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राजकारणात येण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा; अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर टीकेची झोड!

या व्हिडीओमागे भाजपाचे नेते आहेत का असे विचारले असता, याबाबात अद्याप काही सांगता येणार नाही. मात्र, मी भाजपाच्या अध्यक्षांना याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून याप्रकरणी मी निर्दोष सिद्ध झाल्यानंतर निवडणूक लढवू शकेन. जर याप्रकरणी दोषी आढळलो, तर राजकीय संन्यास घेईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उपेंद्र सिंग रावत यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून २०१७ साली उत्तर प्रदेशच्या जैदपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर पक्षाने त्यांना २०१९ साली लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यावेळी भाजपातीलच काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यांनी समाजवादी पक्षाचे राम सागर रावत यांचा जवळपास एक लाख मतांनी पराभव केला होता.