21 February 2019

News Flash

Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीचा अष्टपैलू खेळ, पुणेरी पलटणवर मात

पुण्याकडून नितीन तोमरची झुंज, इतरांची निराशा

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपला पहिला विजय मिळवण्यासाठी पुणेरी पलटण संघाला आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. दबंग दिल्ली संघाने पुणेली पलटणवर 41-37 ने मात करत या स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला. दिल्लीला आपल्या पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर हरयाणा स्टिलर्सचा विजयी श्रीगणेशा

दबंग दिल्लीच्या संघातील सर्व खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. दुसरीकडे पुण्याकडून चढाईत नितीन तोमरने तब्बल 20 गुणांची कमाई केली, मात्र त्याला इतर चढाईपटूंची साथ लाभली नाही. याचसोबत पुण्याच्या बचावपटूंनी मोक्याच्या क्षणी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे दिल्लीला फायदा झाला. दिल्लीकडून नवीन कुमार, चंद्रन रणजित आणि पवन कादियान यांनी चढाईत अप्रतिम गुण कमावले. त्यांना बचावफळीत रविंदर पेहल, विशाल माने, अष्टपैलू मिराज शेख यांनी तितकीच चांगली साथ दिली. पुणेरी पलटणचा पुढचा सामना 14 ऑक्टोबरला हरयाणा स्टिलर्सविरुद्ध होणार आहे.

First Published on October 12, 2018 10:39 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 dabang delhi defeat puneri paltan by 41 37