News Flash

वयाची शंभरी ओलांडलेल्या अण्णांचे उत्साहात मतदान

वयाची शंभरी ओलांडलेल्या या नागरिकाने मोठय़ा उत्साहात मतदान करतानाच इतरांनाही मतदानाचे आवाहन केले.

पिंपरी : वेगवेगळी कारणे पुढे करून मतदानाविषयी अनास्था दाखवणाऱ्या वर्गाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम चिंचवड येथील एका वयोवृद्ध नागरिकाने केले आहे. वयाची शंभरी ओलांडलेल्या या नागरिकाने मोठय़ा उत्साहात मतदान करतानाच इतरांनाही मतदानाचे आवाहन केले.

अण्णा अलंकार (रा. मोहननगर, चिंचवड) असे त्यांचे नाव आहे. ते दूध व्यावसायिक आहेत. चिंचवडच्या मोहननगर भागात ते राहतात. ते नियमितपणे वर्तमानपत्रांचे वाचन करतात. त्यांचे राजकीय ज्ञान उत्तम असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

येथील चोपडा महाविद्यालयात त्यांचे मतदान केंद्र होते. सकाळी अकरा वाजता त्यांनी नातवाबरोबर येऊन मतदान केले. न चुकता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी इतरांनाही केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 5:02 am

Web Title: 100 year old man casts vote with enthusiasm in pimpi
Next Stories
1 पुणेकरांना हलका दिलासा, पण तापमान अद्यापही चाळिशीत
2 रिझव्‍‌र्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेवर आर्थिक निर्बंध
3 पेशव्यांचा प्रेरणादायी इतिहास अभ्यासला जावा
Just Now!
X