पिंपरी-चिंचवड च्या भोसरी परिसरातील नागरी पतसंस्थेवर चोरट्याने डल्ला मारला आहे. चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे.याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन इसम चोरी करत असतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,स्पाईन रोड पांजरपोळ येथे असलेल्या महात्मा फुले नागरी पतसंस्थेवर चोरांनी डल्ला मारला आहे.यात ऐकून १५ हजार रोख रक्कम चोरांनी लंपास केली.अशी फिर्याद मधुकर गोपीनाथ कुळधरण यांनी पोलिसात दिली आहे,पहाटेच्या सुमारास चोरांनी डल्ला मारला,संस्थेचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला आणि आतील कपाटाचे आणि ड्रॉवरचे लॉक तोडून आतील रोख रक्कम चोरी केली आहे.मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 5:24 pm