पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या नराधम पित्याने आपल्याच १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर भोसरी पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या या मुलीवर तिचे वडील मागील एक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. घरात कुणी नसताना वडील तिच्यावर बळजबरी करायचे. अखेर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने मुलीसह भोसरी पोलीस ठाणे गाठले आणि नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी लगेचच मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले. आरोपी हा सुतार काम करायचा. सध्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 6:18 pm