पुणे शहरात दिवसभरात १९६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७४ हजार २०९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५४३ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २५७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६४ हजार ६०७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १३२ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९४ हजार ५३२ वर पोहचली असून पैकी, ९१ हजार २७६ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८४१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.