News Flash

पाण्याच्या डबक्यात पडून दोन चुलत बहिणींचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींपैकी दोघा चुलत बहिणींचा डबक्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये मंगळवारी दुपारी घडली.

| November 6, 2013 02:34 am

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींपैकी दोघा चुलत बहिणींचा डबक्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये मंगळवारी दुपारी घडली. तिसऱ्या मुलीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सोनू महादेव आव्हाड (वय १०) आणि सुनीता सुभान आव्हाड (वय ९, दोघीही रा. देवकर मळा, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी मृत्यू पावलेल्या दोघींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनू आणि सुनीता या दोघी त्यांच्या मैत्रिणींसह दुपारी दीडच्या सुमारास चक्रपाणी वसाहतीमध्ये असलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरून त्यांच्यातील तीन मुली पाण्यामध्ये पडल्या. या तिघी बुडत असल्याचे पाहून इतर मुलींनी त्यांच्या नातेवाइकांना याविषयीची माहिती दिली. नातेवाइकांनी लगेचच तिकडे धाव घेतली आणि या तीन मुलींना पाण्यातून बाहेर काढले. सोनू आणि सुनीता या दोघींना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच दोघी मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्या एका मैत्रिणीवर भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 2:34 am

Web Title: 2 cousin sisters died in pond in bhosari
Next Stories
1 इंदिरानगरमध्ये सोळा किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन
2 चोरलेले ‘ते’ बालक विकले होते नव्वद हजारांना!
3 पुणे विद्यापीठाकडे ५८ नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव
Just Now!
X