पुणे शहरात आज दिवसभरात  ९२४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात ६७ हजार ६५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १  हजार ५९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२४० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५१ हजार ३५३ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत ७९२ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ७९२ जण करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी नऊ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १४ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ६१९ वर पोहचली आहे.  तर २१ हजार ७९८ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात ५९० जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयातील ५ हजार ३१३ सक्रिय रुग्ण संख्या आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.