पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियावर चोरट्यांनी डल्ला मारत २७ लाखांची रोकड लंपास केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेव्हन लव्ह्ज चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बँकेतील एका कर्मचाऱ्याने २७ लाखांची बॅग कर्मचारी बसतात तिथल्या आतल्या बाजू ठेवली होती. त्यावेळीच एकजण बँकेत खातेदार म्हणून आला, कर्मचारी कामात व्यग्र असल्याच्या संधीचा फायदा उठवत चोरट्यांनी २७ लाखांची रोकड असलेली बॅग तिथून पळवली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे. या चोरीमागे ५ ते ७ जण असल्याची शक्यता आहे.