28 September 2020

News Flash

33rd Pune international marathon : इथिओपियाचा अटलाव डेबेड विजेता

विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा

३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे.

सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.

विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 8:22 am

Web Title: 33rd pune international marathon dominion of ethiopian players atlas debed winners
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या पदरी पराभव
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भाचा पहिला विजय
3 Mens Hockey World Cup 2018 : भारतापुढे आता बेल्जियमचे आव्हान
Just Now!
X